रोटरी क्लब चोपडा कडून “माणुसकीची ऊब”-आदिवासी वस्तीमध्ये केले कपडे वाटप

32

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.9डिसेंबर):-राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरत असताना चोपडा येथील रोटरी क्लबने आज नागलवाडी या गावात तेथील गोर गरिबांना कपड्यांचे वाटप करून मायेचा झरा वाहता केला.

चोपडा रोटरीने ‘माणुसकीची ऊब’ या आपल्या प्रकल्प अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत नागलवाडी या आदिवासी गावात सर्व वयोगटातील गरीब व गरजू लहान-मोठ्या मुला-मुलींना व तसेच सर्व आदिवासी बांधवांसाठी आवश्यक कपड्यांचे वाटप करण्यात आले तेव्हा त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सदर कार्यक्रमासाठी चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव,मानद सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ. अमोल पाटील, राधेश्याम पाटील, नितीन जैन,विलास पाटील, पंकज पाटील, चंद्रशेखर साखरे, अर्पित अग्रवाल तसेच गावातील सर्व आदिवासी बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.