श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयातून बी.जे.मध्ये भगवान शेवाळे प्रथम

26

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.10डिसेंबर):-यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्कानंतर विद्यापीठ अनुदान आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने देखील पहिल्यांदाच बहुपर्यायी स्वरूपात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली होती.

विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारितेतील “बॅचलर ऑफ जर्नालिझम” या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच लागला असून,नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयातून भगवान शेवाळे या विद्यार्थ्याने ७८.३६ टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्यसह प्रथम क्रमांक पटकावला आहे.विशेष बाब,जनसंवाद या विषयात त्याने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.तसेच रविराज लोखंडे या विद्यार्थ्याने ७७.१८ टक्के गुण मिळवत द्वितीय तर सतीश आलेवार याने ७६.६४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

श्री गुरु गोविंद सिंघ पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.विकास कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभल असून,शनिवारी प्रा.विकास कदम यांनी पुष्पगुच्छ व प्रगतीपत्र देऊन भगवान शेवाळे यांचा सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी महाविद्यालयाचे प्रा.अमोल धुळे,प्रा.विपीन कदम,प्रा.संजय नरवाडे,प्रा.गुणवंत सरोदे आदींची उपस्थिती होती.