बिलोली शहरातील मुकबधीर दिव्यांग मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या

30

🔹बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती कडुन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर.

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.10डिसेंबर):- नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना हि नांदेड जिल्ह्यातील बिलोली या शहरात काल दि 9 डिसेंबर 2020 रोजी घडली आहे. निसर्गाने दिव्यांगत्व आलेल्या बिलोली येथील मुकबधीर दिव्यांग मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तीची निर्घृण पणे हत्या केली आहे.याच्याच निषेधार्थ कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन आज दि 10 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की सदरील हि घटणा नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी असुन आम्ही सर्व दिव्यांग या घटणेचा जाहिर निषेध करतो तसेच या घटणेला जिल्हा प्रशासन व राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहेत कारण दिव्यांग सुधारीत कायदा 2016 आणि त्या कायद्यातील सर्व कलमे हि आजहि कागदावरच आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नसल्यामुळेच दिव्यांगांवर असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

जोवर अशा घटणेतील नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही तोवर यावर आळा बसणार नाही त्यामुळे तत्काळ नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा दोन दिवसांत संपूर्ण जिल्हाभरात कॅन्डल मार्च काढत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे सदरील या निवेदनावर राहुल साळवेसह,अमरदिप गोधने, प्रदिप हणवते, नागनाथ कामजळगे, कार्तिक भरतीपुरम, सय्यद आरीफ,राजु ईराबत्तीन,संजय सोनुले,मनोहर पंडित, प्रशांत हणमंते, नागेश निरडी, विश्वनाथ सातोरे आणि गणेश मंदा ईल्लया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.