शेती आविष्कार ऑरगेनीक ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

37
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.12डिसेंबर):- रोजी निढळ (ठोबरेवाडी)ता.खटाव,जि. सातारा येथे शेती आविष्कार ऑरगेनीक ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन कंपनीचे चेअरमन मा.अशोक भोसले यांचे हस्ते करणेत आले.त्याप्रसंगी उपस्थित संचालक दादासाहेब भोसले ,सचिन सरतापे,मंगेश सोनवलकर,काळे साहेब,ताटे साहेब व ज्याचे प्रयत्नातून उभे राहिलेले कार्यालय कंपनीचे संचालक तानाजीराव ठोंबरे.

यावेळी बोलताना चेअरमन यांनी जमलेल्या शेतकर्याना कंपनीची ध्येय धोरणे आणि उध्दीष्टे सांगितली.अशोक भोसले म्हणाले आपली कंपनी अल्पभूधारक शेतकरी वर्गासाठी कार्यरत राहणार असून कोणताही अल्पभूधारक शेतकरी सभासद हा वंचित राहणार नाही शासनाच्या ज्या काही योजना शेतकऱ्यासाठी लागू असतील त्या सर्व योजना ह्या शेतकऱ्यापर्यत पोहविल्या जातील जेणे करून सामान्य शेतकरी हा आपल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर सक्षम होईल आज रासायनिक शेतीतून आलेल्या अन्नपदार्थामुळे अनेक प्रकारचे आजार होतात.
त्यामुळे कुटूंब उदवस्त होत आहेत त्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीकडे वळाले पाहिजे त्यासाठी लागणारी सर्व मदत आणि कंपनीची यंत्रणा हि शेतकऱ्याच्या पाठीशी उभी करणार.
याचवेळी महाराष्ट्र विकास आघाडी पश्चिम महाराष्ट्र कार्यालयाचे उदघाटन व पुण्यश्लोकअहिल्यादेवी व क्रान्तिज्योति सावित्रीदेवी महिला विविध उद्योग फेडरेशनच्या कार्यालयाचे उदघाटन आघाडीचे महासचिव आद.अँड.अनिरुद्ध येचले यांचे याचे शुभ हस्ते करणेत आले यावेळी फेडरेशनच्या अध्यक्षा माननीय सौ.रोहिनीताई ठोंबरे याचा सत्कार करणेत आला.त्यानंतर अनिरुद्ध येचले यांनी बोलताना सांगितले की शेती आविष्कार कंपनीने आपल्या ऑर्गनिक शेतीबरोबर पशुधन शेतीला प्राधान्य द्यावे जेणे करून आपला अल्पभूधारक शेतकरी हा अधिक सक्षम होईल.
कंपनीच्या कार्यास शुभेच्छा देऊन आपले मनोगत संपविले.
या कार्यक्रमास गावातील महिला आणि शेतकरी याची उपस्थिती होती कंपनीचे संचालक मंगेश सोनवलकर यांनी आभार मानले.