लोकहितवादी : संत गाडगे महाराज

25

अनेक वर्षांपासुन समाजात ढोंगाचे, पाखंडांचे,कर्मकांडाचे, भोंदुगिरीचे, व्यसनाधिनतेचे, अंधश्रध्देचे, विषमतेचे काळे कुट्ट मेघ दाटुन येतात तेव्हा हा अंधकार दूर करण्यासाठी तथागत बुध्दांपासून संत कबीरांपर्यंत,संत कबीरांपासून संत नामदेव महाराजांपर्यंत, संत नामदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यत तसेच संत तुकाराम महारांजापासून संत गाडगे महाराज,संत तुकडोजी महाराज,संत भगवानबाबांपर्यंत अनेक संतांनी, विचारवंतानी समाज प्रबोधनाचे कार्य केले त्यांच्या कार्या पुढे नतमस्तक होतो.

🔸संत गाडगे महाराजांचे कार्य-कार्यकाल सन 1908 ते 1956 या काळात महान कार्य केले.संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्हयातील शेवगाव या गावी झाला.संत तुकाराम महाराजांपर्यत आलेली ज्ञान,विज्ञान आणि विचारांची चळवळ संत गाडगे महाराजांनी मोठया नेटाने, कष्टाने समाज प्रबोधनाच्या माध्यमातून पुढे नेली.संत गाडगे महाराजांनी कष्टाने उभारलेली चळवळ,धर्मशाळा व इतर सर्व ठिकाणची आजची अवस्था पाहिल्यावर प्रचिती येते. गुरु शिष्य परंपरा नाकारणाऱ्या गाडगे महाराजांचे शिष्य म्हणून अनेकजण मिरवतात.त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी झाले आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा वारसा चालविण्याची मात्र तयारी नाही.
संत गाडगे महाराजांच्या नावे स्वच्छता अभियान राबवताना प्रथम हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी माणसाच्या मस्तकातील हागणदारी दूर करण्याची गरज आहे.

शिवराज्यानंतर लोक कार्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर कित्येक पंचवार्षिक योजनामध्ये झाली नाही.त्यापेक्षा अधिन ज्ञान व समाज परिवर्तनाचे कार्य संत गाडगे महाराजांनी केले. संत गाडगे महाराजांनी, गाडगे, झाडू व गोधडी एवढया साधनाद्वारे हिमलयाएवढे कार्य केले.या माध्यमातून देव, देऊळ,कर्मकांड यांची चिरफाड करुन मानवतेचा प्रकाश टाकला,देव धर्माच्या नावाखाली कर्मकाडांच्या, अंधश्रध्देच्या माध्यमांतून सर्वसामन्यांची प्रचंड लूट होत होती.ती रोखण्याचे कार्य समाज प्रबोधनाच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांनी केले.

सत्यनारायण कथा, अंगात येणारे देव, जादुटोणा आणि चमत्कार यांसारख्या अनेक गोष्टींच्या माध्यमातून समाजाचे मोठया प्रमाणावर शोषण चालू होते. आपल्या किर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान,अंधश्रध्दा, कर्मकांड आणि व्यसनाधिनता यावर मोठया प्रमाणात आसूढ ओढले.संत कबीर,संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या अभंगांच्या माध्यमातून लोक प्रबोधन केले.

“तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ।”
“डोईला गाडगे हातामध्ये झाडू। स्वच्छतेने झाडू अंधश्रध्दा”
“देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बा झाला
देव सोन्याचा केला । सोनार त्याचा बा झाला
देव मातीचा केला । कुंभार त्याचा बा झाला.”
“ऐतखाऊ । भिकेचा भाऊ । येसनांचा डेरा ।
सटवाईचा फेरा”
“प्रपंच करावा नेटका । असू नये फाटका ।”
“जोडीनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी”
“नवसे कन्यापुत्र होती । तरी का करणे लागे पती ।।”
“म्हणती देव मोठे मोठे । पुजताती दगडगोटे।।”
“जत्रा में फत्रा बिठाया । तीरथ बनाया पाणी ।।
दुनिया भई दिवानी । पैसे की धुळधाणी ।।”

यासारख्या अनेक अभंगांच्या,काव्यांच्या माध्यमातून
संत गाडगे महाराजांनी लोकप्रबोधन केले. त्यांच्या किर्तनात ना बुका,ना माळ,ना गळा भेटी तरीसुध्दा ते किर्तनात मोठया प्रभावीपणे लोकभाषेत प्रबोधन करत.किर्तन संपल्यावर अनेक लोक दर्शन घेण्यासाठी यायचे परंतु ते कोणालाही दर्शन घेवू देत नसत. मानवतेपेक्षा कोणाताही देव,धर्म,मोठा नाही. सत्यनारायण्या सारख्या चा सारखा कथा करु नका यामध्ये सामान्यांची लूट होते. चमत्काराने काही होत नाही,कोणतीही देव, देवता तुम्हाला त्रास देत नाहीत.जनसेवा हीच ईश्र्वरसेवा आहे. सटवाई,म्हसोबा यासारख्या देवांना कोंबडे, बकरे कापू नका.

कोणताही देव कोणाच्याही अंगात येत नाही.हे सगळे थोतांड आहे हे बंद करा आणि आपल्या जीवनाचा उपयोग इतरांना झाला पाहिजे,कष्ट करा आणि आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा, मनावर मानवतेचे संस्कार करुन घ्या,माणसा-माणसात कोणताही भेद करु नका,कमीत कमी खर्चात लग्ना सारखे कार्य करा,माणूस मेल्यानंतर काही कर्मकांड करु नका, माणूस जिवंत असताना त्याची सेवा करा, उपाशी रहा पंरतू कोणत्याही सावकाराचे कर्ज काढू नका. अशा प्रकारचे प्रबोधन अनेक भागांतून केले.तथागत गौतमबुध्द,संत नामदेव, संत कबीर,संत तुकाराम हे गाडगे महाराजांनी अनेकांच्या मस्तकांत रुजवले.आज आपल्या देशात देवधर्माच्या नावाखाली स्वंयघोषीत बुवा,बापु आणि कापूंच्या माध्यमातुन अनेक स्त्री पुरुषांचे मानसिक, शारिरीक आणि आर्थिक शोषण केले जाते.समाज प्रचंड प्रमाणात लुटला जात आहे हे रोखण्यासाठी संत गाडगे महाराजांचे कार्य महत्वाचे आहे.

🔹शेतकरी आत्महत्या
आज शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी संत गाडगे महाराजांचे विचार प्रभावी वाटतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा हत्या कराव्यात. परंतू माणसाची हत्या करुन जगातला कोणतीही प्रश्न सुटला नाही. शेतकऱ्यांनी अज्ञान, कर्मकांड,आळस आणि व्यसनांची हत्या केली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही.संत गाडगे महाराजांच्या समाज प्रबोधनातून आणि अनेकांच्या सहकाऱ्यांतून अनेक ठिकाणी नदींना घाट बांधले,अनेक ठिकाणी लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या, अनेकांच्या निवाऱ्याची सोय केली. अशी अनेक कार्य गाडगे महाराजाच्या माध्यातून केली गेली.
—————————-
🔸समारोप-
संत गाडगे महाराज यांचा वसा आणि वारसा पुढे आपापला चालवत असताना शिक्षणाला महत्व दयावे लागेल.देव देवतांच्या मंदीरांपेक्षा ज्ञानमंदीरे विकसीत करावी लागतील,गाव हागणदारी मुक्त करताना डोके वैचारिकदृष्टया हागणदारी मुक्त करावे लागेल.आत्महत्या मुक्त शेतकरी,दंगलमुक्त देश, व्यसनमुक्त तरुन ही अभियाने देश पातळीवर राबवावी लागतील.हे कार्य वसा आणि वारसा म्हणून करावे लागेल. संत गाडगे महाराज ज्ञान,विज्ञान,विचार आणि सामाजिक उत्तुंग कार्याला विन्रम अभिवादन !

जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय ज्योती ! जय भिमराय !
जय संत गाडगे महाराज !
—————————-

✒️लेखक:-रामकिसन गुंडिबा मस्के (सर) मोबा-9422930017

▪️संकलन:-नवनाथ पौळ
( केज तालुका प्रतिनिधी)
मो-8080942185