अंबड, घनासावंगी मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध करा

29

🔹माजी आमदार भाजपा जेष्ठनेते विलासराव खरात यांचे जाहीर आवाहन

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.22डिसेंबर):-ग्रामपंचायत निवडणुकीवरून गावा-गावात , सख्या नातेवाईकांमध्ये दरी निर्माण होऊन भांडणे होतात व एकमेकांविरोधात वैर निर्माण होते , परिणामी भांडणे असल्याने गावचा विकास होण्यास अडथळे येतात , गावचा विकास करण्यासाठी व वैर टाळण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात असं जाहीर आवाहन भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी आमदार विलासराव बापु खरात पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा व पदाधिकारी नियुक्ती सत्कार समारंभानिमित्त तीर्थपुरी येथे केले.सदरील प्रशिक्षण कार्यक्रम अभियानाच्या उदघाटनप्रसंगी तीर्थपुरी येथे बोलतांना केले.

पुढे बोलतांना विलासबापु खरात म्हणाले की ग्रामपंचायतची निवडणुक बिनविरोध झाल्यास अशा ग्रामपंचायतीनां शासन भरीव स्वरूपात विकास निधी देते, परिणामी विकास निधी मिळाल्याने गावची विकास कामे करण्यास मदत होते व निवडणुकी झाल्यास होणारे वाद विवाद टाळता येतात असं बोलतांना विलास बापु यांनी सांगितलंम्हणून कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं.तसेच पुढं बोलतांना बापु यांनी सांगितलं की मतदार संघांतील ज्या 63 ग्रामपंचायती आहेत तिथं भाजपाच्या वतीने संपूर्ण ताकतीनिशी ग्रामपंचायती लढवल्या जातील असंही भाषणादरम्यान सांगितलं तसेच मतदार संघात सर्व ठिकाणी भाजपाच्या वतीने उमेदवार रिंगणात उतरवले जातील व तितक्याच ताकतीने आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी लढतील अशी ग्वाही विलास बापु खरात यांनी दिली.

यावेळी उपस्थित सिद्धीविनायक मुळे यांनी भाषणात सांगितलं की, ग्रामंपचायत निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या गावपातळीवरील कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम खयाअर्थाने माजी आमदार अॅड. विलासबापू खरात यानी केले आहे, त्यांची कार्यकर्त्यांशी जोरदार फळी या मतदार संघात कार्यरत आहे.भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठका तालुक्यात वेगवेगळ्या भागातसुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचं महत्व वेगळं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,
शिवसेना आणि भाजपची ताकद गाव पातळीवर आहे. ग्रामीण भागात कार्यकर्त्यांना काम करण्याची, भाजपचे संघटन उभ करण्याची संधी आहे.

यानिमित्ताने भाजपला ग्रामीण भागातील पाया भक्कम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.भाजपने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार विलास बापु खरात यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सरचिटणीस, तसेच मतदार संघातील बहुतांशी गावातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.