माधुरी ताई उदावंत यांना कोरोना योद्धा सन्मान- झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन सन्मान

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

पुणे(दि.24डिसेंबर):-मानवाधिकार संरक्षण समिती (नवी दिल्ली) जळगाव जिल्हा ,नियुक्ती पत्र, चर्चा सत्र पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. विविध पदाधिकारी नियुक्ती पत्र, ओळखपत्र वितरण ,कोरोना योद्धा सन्मान सोहळा,झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सोहळा ,विविध पदावर नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. माधुरी ताई उदावंत यांची उत्तर महाराष्ट्र महिला संघटक प्रमुख पदी निवड झाली तसेच त्यांना विजया ताई काचावर यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन सन्मानित केले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी विजय कुराडे सर, महा. राज्य उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड सर, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी जी एम भगत सर, मुंबई जनसंपर्क अधिकारी गुलाबराव गायकवाड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रघु भोसले, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी संतोष पाटील, माहिती अधिकार प्रदेश उपाध्यक्ष विजया ताई काचावर, जामनेर तालुका जनसंपर्क अधिकारी दशरथ पाटील, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पाटील ,जामनेर तालुका संघटक राहुल रॉय मूळे जामनेर तालुका सचिव कपिल पाटील,जामनेर तालुका सहसंघटक गोकुळ थाटे, सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी तसेच उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.