इडीकडून २५५ कोटीची मालमत्ता जप्त

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24डिसेंबर):- राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा ईडीने मालमत्ता जप्तीची मोठी कारवाई केली आहे. आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीच्या गंगाखेड, बीड व धुळे येथील तब्बल २५५ कोटीची मालमत्ता रात्री उशिरा जप्त केली आहे. परिणामी रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यांना ईडीने मोठा झटका दिल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.

 गंगाखेड येथील आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या मालकीच्या गंगाखेड शुगर अन्ड एनर्जी या साखर कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याचे आरोप प्रकरणी रत्नाकर गुट्टे यांना अटक झालेली होती. याच पार्श्वभूमीवर ईडीकडे तक्रारही आली होती. या तक्रारीच्या आधारावर ईडीने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर अन्ड एनर्जी लिमिटेड या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी ह्याचरिज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेड व इतर कंपन्यांमध्ये लावली असल्याचा आरोप हे यानिमित्ताने केला आहे.

काल रात्री उशीरा झालेल्या कारवाईत ईडीकडून गंगाखेड शुगर अन्ड एनर्जी लिमिटेड २४७ कोटीचे यंत्र प्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन योगेश्वरी ह्याचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या गंगाखेड, बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची ०१ कोटी १० लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता असे एकूण २५५ कोटीची मालमत्ता जप्त केल्याचे बोलले जात आहे.