नांदेड जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

27

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.25डिसेंबर):-शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन 2021 या वर्षाकरीता नांदेड जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यात सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी सोहळा मि. मार्गशिर्ष कृ. 13 निमित्त, सोमवार 1 मार्च 2021 रोजी हाजी सय्याह सरवरे मगदुम (रहे) कंधार ऊर्स आणि सोमवार 13 सप्टेंबर 2021 रोजी जेष्ठा गौरी पुजन निमित्त या तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

या स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. तसेच हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत म्हटले आहे.