अनिसचे प्रकाशजी वेदपाठक यांचा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित मध्ये जाहीर प्रवेश

    42

    ✒️राहुल कासारे(अंबेजोगाई प्रतिनिधी)मो:-9763463407

    अंबेजोगाई(दि.11जानेवारी):-वंचित आघाडी चे सर्वे सर्वा श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचीत आघाडी हा तीसरा पर्याय महाराष्ट्रा समोर नव्हे तर देशाला मिळाला आहे .लोकसभा व विधानसभा प्रचंड जनमत मिळविलेल्या वंचीत आघाडीला आज माहाराष्ट्रातील ग्रामपंचायती सुध्दा लढविण्याचा संकल्प केला आहे याची धुरा प्रत्येक जिल्हा आध्यक्ष यांच्यावर सोपवण्यात आली आहे बीड जिल्हातील आंबजोगाई तालुक्यात विविध ठीकानी कार्यकर्ते जिवाच रान करून कामाला लागले आहे त्याच बरोबर वंचीत व उपेक्षीत जातीला पक्षात संधी दिली आहे.

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश वेदपाठक सर यांच्यासह ओबीसी समुहातील असंख्य कार्यकर्ते यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका अध्यक्ष संजय तेलंग यांच्या नेतृत्वाखाली जाहिर प्रवेश केला. हा सोहळा आज अंबाजोगाईत बीड जिल्हा आध्यक्ष आनिल डोंगरे ,जेष्ट नेते डॉ.नंदकीशोर सोमवंशी ,महासचीव देविदास बचुटे , जिल्हा उपाध्यक्ष शैलेश कांबळे , वंचित बहुजन आघाडी चे नेते खाॅजा पठान, तालुकाध्यक्ष संजय तेलंग , तालुका प्रवक्ते गोविंद मस्के , अंबाजोगाई शहराध्यक्ष आमोल हातागळे, तालुका कोषाध्यक्ष राहुल कासारे व आंबाजोगाई तालुका कार्यकारणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

    सदरील कार्यक्रमात तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद सर्कल प्रमुखांच्या निवडी करून पक्षाची विचारधारा व कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविद मस्के यांनी केले तर मनोगत डॉ .नंदकीशोर सोमवंशी जेष्ट नेते यांनी केले तर आध्यक्षीय भाषण अनिल भाऊ डोंगरे यांनी केले तसेच आभार रत्नदीप सरवदे व सुत्रसंचलन राहुल कासारे यांनी केल.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय तेलंग व शहराध्यक्ष अमोल हातागळे तसेच कोषाध्यक्ष पत्रकार राहुल कासारे व इतर पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.