उदयकुमार पगाडे यांना “स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्कार 2020” प्रदान

31

🔹कर्नाटक मधील “गोल्डन केअर क्लब” मार्फत ऑनलाइन पुरस्कार सोहळा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.13जानेवारी):-दि.12 जानेवारी 2021 रोजी मंगळवारला आपल्या भारतातील एक महान व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांची 158 वी जयंती आहे..स्वामी विवेकानंद यांना जागतिक स्तरावर युवकांचे प्रेरणास्थान मानल्या जाते. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.

याच निमित्ताने कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील “गोल्डन केयर क्लब” संस्थे मार्फत आपल्या चंद्रपूर जिल्यातील ब्रम्हपुरीतील रहिवासी, युवा नेतृत्व, सदैव एकत्रितपणे वेगवेगळ्या युवा लोकांशी मिळून अनेक क्षेत्रात सामाजिक कार्यात सहभागी होऊन उत्कृष्ट समाजकार्य केल्याबद्धल, उदयकुमार सुरेश पगाडे (वय-26) यांना आज “स्वामी विवेकानंद_ जीवन गौरव पुरस्कार_2020” हा राष्ट्रीय पुरास्कार आनलाईन स्वरूपात प्रदान करण्यात आला..