ब्रम्हपुरी तील इन्स्पायर अकॅडमी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

43

🔹स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.13जानेवारी):- येथील इन्स्पायर करिअर अकॅडमी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय निलेश कुमार मंढरे, मंडळ कृषी अधिकारी ब्रह्मपुरी हे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय जाधव साहेब सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ब्रह्मपुरी , मा प्रा. लक्ष्‍मण मेश्राम संचालक इन्स्पायर करिअर अकॅडमी ब्रह्मपुरी, दीपा मॅडम , विवेक खरवडे सर ,माननीय शंकर ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद तथा राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत स्वतःला अभ्यासात झोकून द्या, वेळेचे योग्य नियोजन करा आणि सतत सराव करा असा मौलिक सल्ला प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मांढरे सर यांनी दिला त्याचप्रमाणे ते म्हणाले की अभ्यासाला पर्याय फक्त अभ्यासच आहे, सतत मेहनत केली तर यशापासून कोणालाही रोखता येत असे मत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात माननीय दीपक सेमस्कर सरांनी विवेकानंदांच्या एकाग्रतेचा दाखला देत मन एकाग्र असल्यावर कोणती ध्येय साध्य करता येते असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक लक्ष्मण मेश्राम यांनी केले आपल्या प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट सांगून विद्यार्थ्यांना चांगल्या व्यक्तींकडून प्रेरणा घ्यावी व व स्पर्धा परीक्षेचा मार्ग मोकळा करावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अश्विनी गोपाले तर आभार सोनी गायकवाड हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता किशोर हलदार मंथन गुरुनुले, विकास विकास मेश्राम उज्वला निंबेकर सोनाली ठाकरे सविता धोंगडे इत्यादींनी सहकार्य केले.