गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पाच पोलीसांचा पोलिस अधिक्षकाकडुन सन्मान

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18जानेवारी):-सद रक्षणाय खल निग्रहणाय
पोलिसांची सेवा सदैव नागरिकांच्या संरक्षणासाठी अविरत असते. पोलिस कर्मचारी आपन केलेल्या कामाबदल आपल्या पाढीवर शाब्बासकीची थाप मिळाली की, अनखी कामाला हुरुप येते. परभणीचे नव्याने रुजु झालेले पोलिस अधिक्षक जयंत मीना यानी अवैध धंदे वाल्यासह गुटखा माफीयांचे धाबे दनानुन सोडले.

आशा या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक यांच्या वतीने गंगाखेड पोलिस ठाण्यातील आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलिसांचा रोख रक्कम देवुन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर याच्चा मार्गदर्शनाखाली व पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तपासणी पथकाने गंगाखेड पोलीस ठाण्याची 2020 -2021या वर्षाची वार्षिक तपासणी दि.5 जानेवारी झाली.

पोलीस ठाण्यातील वार्षिक तपासणी दरम्यान वर्गवारी नुसार अभिलेखे, मुद्देमाल,व्यवस्थितरित्या लेबलीग केले.मुद्देमालाच्या दर्शनी भागावर योग प्रकारचे टिक मार्क केले.पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर याच्या मार्गदर्शनाखाली     पोलीस स्टेशनला असलेली भाग1 ते5 प्रोव्हीबिशन इतर मुद्देमालाची तपासणी केली.अभिलेखातील सि .एक, सि.दोन ,सि.तीन यात केलेल्या अभिलेखातील गोपनीतेची अदयावत ,व्यवस्थितरित्या नोदी ठेवुन परिश्रम घेतल्याचे तपासणी दरम्यान निर्देशित झाले.

अथक परिश्रम घेतल्याबद्दल प्रोत्साहन म्हणुन सहाय्यक उप पोलीसनिरीक्ष बी.व्ही.धुमाळ याना पाच हजार रूपये सन्मान पत्र, पोलीस जमादार उमाकांत जामकर याना दहा हजार रूपये आणी सन्मान पत्र, पोलीस संतोष शिंदे याना दहा हजार व सन्मानपत्र, पोलीस अय्युब शेख याना पाच हजार रूपये, पोलीस अनिल भराडे याना पाच हजार रूपये सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.