भिमा कोरेगांव खरे आत्मसन्मानाचे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध – रामचंद्र सालेकर (राज्यउपाध्यक्ष- शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद)

32

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.18जानेवारी):-भारतीय बौद्ध महासभा शाखा वरोरा द्वारा आयोजित भाऊराव निरंजने विदर्भ अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांचे अध्यक्षतेखाली दि.१७ जानेवारीला २०२१ ला भिमा कोरेगांव शौर्य दिन प्रबोधन कार्यक्रम आयोजित कराण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रामचंद्र सालेकर यांनी आपल्या भाषणात सांगीतले की, छ. शिवराय यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करुन आपल्या सैनिकांना मराठा हे बिरुद देवून एका सुत्रात बांधले व या देशात निर्माण केल्या गेलेल्या जातीयवादी कलंकीत वर्णव्यवस्थेला शिवरायांनी पहिला सुरुंग लावला. हा जातीयवाद मिटवून महाराष्ट्रात मराठ्यांच स्वराज्य निर्माण केलं. मराठा म्हणजे शिवरायांचा सैनिक तो कोणत्याही जातीचा असो हा शिवरायांच्या सैनिकांचा समुहवाचक शब्द आहे.

यामध्ये महार जातीचे मराठे अतिशय काटक शूर लढवय्ये व प्रामाणीक त्यामुळे छ.शिवरायांचा त्यांच्यावर दृढ विश्वास होता किल्ल्याच्या किल्लेदारापासून, किल्ल्याच्या पायथ्याशी पहिलं संरक्षण कडं हे महार सैनिकांच्या तुकडीच असे.शिवरायांनी गावपाटीलकी महारांना दिली.या रयतेच्या स्वराज्यासाठी महार जातीचं फार मोठे योगदान असल्यानेच या राज्याला महाराष्ट्र म्हणतात. एक शुद्र राजा झाल्याचं शल्य मनुवाद्यांना फार बोचत होतं,त्यांच्या राज्यभिषेकाला विरोध करण्यापासून ते त्यांना संपवण्यापर्यंत यांनी प्रयत्न केले.

छ.शिवरायांचे राज्यकारभारातील प्रमुख पद पेशवा या मनुधार्जीण्या जातीकडे होते याचे कारण याच जातीकडे शिक्षण असल्याने लिहणे वाचणे हिशोब ठेवण्याचे पत्रव्यवहाराचे काम यांच्याशिवाय होणे शक्य नव्हते. एवढ्या महत्वाच्या पदावर मनुवादी असल्याने त्यांना एका शुद्र राज्याच्या हाती काम करण त्यांना फार बोचत होतं,त्यांनी स्वराज्याच्या या छ.शिवरायांच्या कार्यात फार अडथडे निर्माण केले होते.माता जिजाऊंनी जसे पुत्र शिवाजीला घडविले तसचं नातू छ.संभाजीस घडविण्यात कसलीही त्यांनी कसर ठेवली नाही. हा छ.शिवरायांचा छावा पित्याप्रमानेचं महापराक्रमी महाविद्वान अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण सारखे चार ग्रंथ लिहीले.अवघ्या नऊ वर्षाच्या काळात अनेक लढाया लढल्या एकाही लढाईत हार न पत्करणाऱ्या राजाचा इतिहास या देशातील मनुवादी इतिहासकारांनी बदणामीकारक घानेरड्या पद्धतीने लिहून ठेवला आहे.

ऐवढच नव्हे तर या धर्ममार्तंडांनी त्यांच्या विषमतावादी जातीय व्यवस्थेला लाथाडणाऱ्या व समतेच राज्य निर्माण करणाऱ्या या महान राज्याला हाल हाल करुन अवघ्या बत्तीस वर्षाच्या अल्प वयात मारले. संगमेश्वर येथे कपटाने संभाजी राजांना पकडण्यात आले तेथून एकोणचाळीस दिवसाच्या प्रवासात हाल करत मृनुस्मृतीच्या कायद्यानुसार संगमेश्वर येथून तुळापूर वडू बुदृक येथे आणून तुकडे तुकडे करुन नदीच्या काठावर फेकून देवुन मनुवाद्यांनी फर्मान सोडले की बादशहाचा हुकूम आहे की जर कोणी या शरीराच्या तुकड्यांना हात लावण्याच त्याला अग्नी देण्याच दुस्साहस केलं तर त्याला मौत दिल्या जाईल.

त्यामुळे कोणी गावचा प्रमुख पुढे यायला तयार नव्हता तेव्हा येथील महिलांनी प्रथम हिंमत दाखवली मोठ्या धाडसाने गणपत महाराने ते तुकडे गोळा करुन शिवून घेतले कोणी अंत्यसंस्कारासाठी जागा देत नव्हते तेव्हा गोंविंद गायकवाड नावाच्या महाराने आपली जागा दिली व तिथे अंत्यसंस्कार केला. अशा महान राजाचा असा दुर्दैवी अंत झाला.जर का हे दोन्ही राजे शंभर वर्ष आयुष्य जगले असते व या मनुच्या पिलावळांचा राज्यकारभारात हस्तक्षेप नसता तर त्यांचं भारतावरच नव्हे तर जगावर राज्य असत व आपल्या प्रत्येकाच्या घराला सोन्याची दारं असती. भारताच्या इतिहासात १८५७ चे पानिपतचे युद्ध हे पहाले स्वातंत्र्य युद्ध म्हणून इतिहासात लिहील्या गेले. परंतु भारताच्या इतिहासात पेशवाईचा काळ जगातला मानव जातिसाठी कलंकीत असा इतिहास असलेला काळ या काळात मानसाला अछुत मानून जनावराची वागणूक दिली गेली.

अनन्वीत अत्याचार करणारा जगातला काळाकुट्ट इतिहास म्हणजे पेशवाईचा काळ होय. या पेशवाईच्या गुलामीतून बहुजनांना स्वतंत्र करणारं पहिलं स्वतंत्र्य युद्ध म्हणजे १ जानेवारी १८१८ चं भिमाकोरेगांव युद्ध होय व त्याचा खरा हिरो पाचशे महार सैनिकांचा सेनापती शिदनाक महार हा होय.शिदनाकचा दुसऱ्या बाजीरावने केलेल्या घोर अपमानातून ही क्रांतीची ज्वाला पेटली,पेशवाईकडून युद्धात भाग घेण्यासाठी शिदनाकने फक्त एकच मागणी केली की आम्हा महारांना ही जी वागणूक दिल्या जात आहे की कमरेला खराटा व गळ्यात गाडग आणि दुपारच्या प्रहरातच घराबाहेर पडायचं बंधन दूर कराव व आम्हाला मानूस म्हणून वागणूक द्यावी. यावर दुसऱ्या बाजीरावाने धर्मशास्त्रानुसार तुम्ही याच लायकीचे आहात तुम्हाला सुईच्या टोकाएवढं सन्मानाने जगण्याचा हक्क मिळणार नाही असे सांगून अपमाणीत केले.या अपमानाने अंगार होवून इंग्रजांसोबत मिळून अवघ्या आठशे चौतीस सैनिक त्यात पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैनिकांना धुळ चारली व पेशव्यांवर विजय मिळवून पेशवाई दफन केली. पेशवाईच्या जुलमी गुलामीतून स्वतंत्रता मिळाली. हीच लढाई खऱ्या अर्थाने भारताचे पहिलं आत्मसन्मानाचं स्वातंत्र्य युद्ध होते. यामध्ये जे सैनिक कामी आले.

त्यांच्या नावाचा विजय स्तंभ भिमा कोरेगाव येथे इंग्रजांनी उभारुन या योद्यांचा सन्मान केला आहे. या ठिकाणी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर १ जाने.१९२७ पासुन नियमित माथा टेकवायला जात. या स्वातंत्र्य युद्धाला १ जानेवारी २०१८ ला दोनशे वर्ष पूर्ण झाले होते.त्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातुन लोक तिथे गोळा झाले होते. परंतु मनुवादी समाजकंटकांनी या आनंदाच्या क्षणाला अपप्रचाराचं विष पेरुन तिथे दंगल घडवून आणली या शौर्य दिनाला काळीमा फासण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आजही या पेशवाईचे पाळेमुळं राजसत्तेत धर्मसत्तेत अर्थसत्तेत घट्ट बसले असून याचा देशाला गंभीर धोका असल्याचे प्रतिपादन रामचंद्र सालेकर राज्यउपाध्यक्ष डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजकुमार जवादे अध्यक्ष बहुजन एम्लाईज फेडरेशन चंद्रपूर यांनी येणाऱ्या काळातील संभाव्य धोके विशेद करुन समाजाला जागृक राहण्याचे आवाहन केले. चंद्रशेखर झाडे संभाजी ब्रिगेड चंद्रपूर यांनी सरकार बहुजन विरोधी कायदे तयार करुन बहुजन समाजाला परत गुलामीच्या खाईत लोटत असल्याची जाणीव करुन दिली. खैरे यांनी संविधानावर गीत सादर केले.कार्यक्रमाचे आयोजक तथा अध्यक्ष भाऊराव निरंजने विदर्भ अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी समाजाने सहकार्याची भुमीका ठेवून समाजपरिवर्तनाच्या कार्यात योगदान देण्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रतीभा जुलमे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्तावीक सिंधु देवगडे यांनी तर आभार मालती कांबळे यांनी मानले. अॕड.प्रिया पाटील, हरिभाऊ दारुंडे अदिंनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी प्रयत्न केले.