शाखा प्रबधंकाने त्रास दिल्याने अपंगाची धाव ना. बच्चुभाऊ कडु यांचे कडे

26

🔹शाखा प्रबंधकचा मनमानी कारभार,अपंगाना कर्ज देता येत नसल्याची ओरड

✒️प्रदीप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.23जानेवारी):-1 जिल्ह्यातील स्थानिक नांदगाव खंडे येथिल सेंटल बॅक शाखेतील मॅनेजर हे खुर्ची वर बसुण आपले गरीबीचे भान विसरुण गेल्या सारखे अपंग यांच्याशी बोलत असल्याने नांदगाव खंडेश्वर येथिल दिव्यांग सौ.यमुना ज्ञानेश्वर मुके रा.नांदगाव खंडेश्वर,तसेच येनस येथिल प्रदिप रघुते यांनी कोरोना सारख्या महामारीत जिवन जगणे कटीन झाल्याने काही तरी पोटभरण्यासाठी एखादा व्यवसाय करावा म्हणुन अपंगाना शासन निर्णया प्रमाणे बिजभांडवल चे कर्ज समाज कल्यान अतंर्गत 1लाख 50 हजार रुपये व्यवसाय करण्यासाठी दिल्या जाते..पण सेंट्रल बॅक मॅनेजरच्या बोलण्यावरून असे दिसुण येथे.की शासन निर्णय हा फक्त अपंगाची दिशाभुल करण्यासाठीच असेल असा प्रश्न आज अपंगा समोर उभा आहे.

कारण अपंग बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हनुन शासनाच्या शासन निर्णया प्रमाणे सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग मुबई_21 शासन निर्णय क्र.अपंग \2008\पत्रं क्रं.292/सुधार_3दि.2जुलै 2010 रोजी निर्गमित करुण अपंग बेरोजगारांना 150000/-रु कर्जाची बिज भाडंवल योजना सुरु केली होती .या योजने मध्ये एकुण 150000/-पैकी 20 %रक्कम जि.प.समाज कल्यान अपंग विभाग अणुदान म्हणुन देते.व 80 %रक्कम हि बॅक कर्ज म्हणुन देते .या मधुन अपंग बेरोजगारांना व्यवसाय करावा लागतो असे आदेश असुन सुद्धा अनेक गरजु अपंग जिल्हा समाज कल्यान अपंग विभागाकडे शासन निर्णया प्रमाणे अर्ज केले होते.

.त्या साठी ..अपंगाना सेंट्रल बॅके मधुन कर्ज नसल्याचा दाखला घ्या लागते तेव्हा अपंग यांचे कडुन 118 रुपये भरुणच हा दाखला देतो..अप़ग विभाग सदर अर्जाची शहानिशा करुन सेंट्रल बॅक ऑफ इडीया शाखा नांदगाव खंडेश्वर येथे मंजुरी साठी पाठविले असता आज जवळपास दोन महिण्याचा कालावधी होउण गेला.या दोन महिण्या मध्ये सौ.यमुना मुके.व प्रदिप रघुते हे 25 चकरा मारुण शेवटी आज त्यांना हे सांगण्यात आले कि ह्या बॅकेतील पैसा हा अपंगानसाठी नसुन तो शेतकरी यांच्यासाठी आहे..आपले भाण जागेवर न ठेवता कधी म्हणतो हे गाव आमच्या शाखेत येत नाही आम्हाला बिडीओ यांनी आदेश दिले.

अपंगाना शाखेतील मॅनेजर हे नाहक त्रास देत असल्याने अपंग यांनी बॅक मॅनेजर यांचेवर त्वरीत कार्यवाहीची मागणी..मा.अपंग आयुक्तालय पुणे,मा.आमदार बच्चुभाऊ कडु,मा.जिल्हाधिकारी साहेब अमरावती तसेच बॅक मॅनेजर जिल्हा अग्रणी बॅक शाखा अमरावती यांचे कडे केली असुण जर कार्यवाही न झाल्यास अपंग यांना रोजगारां पासुन वंचित ठेवल्याने आमरण उपोषन करण्याचा इशारा सुद्धा अपंगानी दिला आहे.