शहादा तालुका सुरक्षित बेरोजगार संघातर्फे दोंडाईचा येथील श्री.संतोष भाऊ कोळी पत्रकार सत्कार

26

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.23जानेवारी):- येथील सामाजिक कार्यकर्ता,व अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी निवड झाली, या निमित्ताने शहादा येथे पत्रकार संतोष कोळी यांच्या सुशिक्षित बेरोजगार संघटना यांच्या मान्यतेने सत्कार करण्यात आला.

या संघटनेचे कायदेशीर सल्लागार अँड संतोष भोई याच्या अध्यक्ष ते खाली सुशिक्षित बेरोजगार संघाचे तालुकाध्यक्ष भूराभाऊ मालचे, उपाध्यक्ष प्रविण कुंवर, दिपक पानपाटील साक्री तालुका अध्यक्ष आदित्य मोरे रमेश खैरनार, सुरतशहर उपाध्यक्ष प्रविण कुंवर, दोंडाईचा शहराध्यक्ष कैलास पाटील, उपस्थित होते.

दोंडाईचा येथील मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष,तथा अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे, धुळे जिल्हा अध्यक्ष, यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी निवड झाल्याबद्दल, पत्रकार संतोष कोळी यांच्या सत्कार करण्यात आला.