थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी महोत्सव २०२१ उत्साहात संपन्न

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.25जानेवारी):-मनमाड येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी, कृषिशास्र विभाग अंर्तगत आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून २२ते २८ जानेवारी दरम्यान दहाव्या जागतिक कृषी महोत्सव सप्ताहाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रासह जपान , फिनलँड , कॅनडा , नेपाळ या देशांसह मध्यप्रदेश ,छत्तीसगढ, हरियाणा , कर्नाटक व गोवा या राज्यांमध्ये करण्यात आलेले आहे.

दरवर्षी नाशिक येथे डोंगरे वस्ती गृहावरील मैदानावर भव्य स्वरूपात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते , या मध्ये लाखो शेतकरी आपला सहभाग नोंदवता असतात.परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संक्रमनाच्या परिस्थिती मुळे गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरच छोटेखानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या उपक्रमा अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र(दिंडोरी प्रणित)मनमाड यांच्या कडून वडगाव पंगू येथे कृषी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.यावेळी गावातील मान्यवर तसेच शेतकरी,ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. वडगाव पंगु येथील शिक्षक श्री विठ्ठल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. समस्त ग्रामस्थ,शेतकरी बांधवांना कृषी,विवाह,ग्रामदैवत,सेंद्रिय देवता ,बालसंस्कार,देवघर-देव्हारा, मराठी अस्मिता,जनकल्याण आदी विविध विषयांवर सेवेकरी वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी खूप उस्फुर्त प्रतिसाद दिला.मनमाड सेवा केंद्रातील महिला व पुरुष सेवेकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED