जिवती तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कट्टीबद्ध -आमदार सुभाष धोटें

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.30जानेवारी):-तालुक्यातील पाटण येथे महाराजस्व अभियान अंतर्गत आदिवासी वन हक्क कायद्यानुसार आदिवासी समाजातील शेतकर्‍यांना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शेतजमीनीचे पट्टे, रेशन कार्ड वाटप आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभार्थ्यांना २० हजार प्रत्येकी प्रमाणे धनादेश वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जीवती तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कट्टीबद्ध असून जवळपास १८० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. तालुक्यात सिंचन सोयीसाठी शासनाच्या जलसंधारण योजने अंतर्गत लवकरच ३ तलावांचे कामे पूर्ण होतील. महसूल विभागामार्फत जमीनीची मोजणी सुरू होताच चंद्रपूर जिल्ह्य़ात सर्व प्रथम जीवती तालुक्यापासुन सुरूवात करण्यात येणार आहे. अनेकांना जातीचे दाखले मिळू लागले आहेत.

तालुक्यातील रस्ते व अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ८४ प्रकरणे मार्गी लागले आहेत. शासनाने कृषी विभागा अंतर्गत विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळून शेतमालाला योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा असे आवाहन केले.

या प्रसंगी राजुरा उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, आदिवासी जेष्ठ नेता तथा माजी जि प सदस्य भिमराव पाटील मडावी, पं स सभापती सौ अंजनाताई पवार, सौ सुषमा मडावी सरपंच, तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील, गणपत आडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमीटी जिवती, सुग्रीव गोतावळे माजी प स सदस्य, सिताराम मडावी संजय गांधी निराधार योजना सदस्य तथा अध्यक्ष ता. युवक काँ. , गेडाम नायब तहसिलदार, शामराव कोटनाके, ताजुद्दीन शेख, भिमराव पवार उपसरपंच, अब्बास भाई, कलीम भाई, रसुल भाई, कांबळे, पांडु पवार, गंभीरे माॅडम, गोडबोले माॅडम तालुका कृषी अधिकारी, डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवती, मुख्यधापक, पाटण परिसरातील नागरिक, इत्यादी उपस्थित होते.