श्रीमती.वैशाली निर्मला बापुराव चव्हाण यांना मानाचा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडुन दिला जाणारा महिला भुषण पुरस्कार प्रदान

25

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.30जानेवारी):- नाशिक येथील आस्था अनघादि फौंउडेशन च्या वैशाली निर्मला बापुराव चव्हाण यांना शिर्डी येथे सरपंच सेवासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील महिला भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संरपच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयाेजीत “मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान साेहळा २०२० ,महान संत साईबाबांची पावन भुमी शिर्डी येथे दि २२ जानेवारी राेजी आयोजित करण्यात आला होता.

शिर्डी लाेकसभा मतदार संघाचे खासदार मा.सदाशिवराव लाेखंडे,समाज प्रबाेधनकार मा.निवॄत्ती महाराज देशमुख ईदुंरीकर,माननिय राज्यमंत्री नगरविकास महाराष्ट्र राज्य प्राजक्त तनपुरे,संरपच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे साहेब,संरपच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,सघांचे राज्य पदाधिकारी यांच्या हस्ते महिला भुषण राज्य स्तरीय पुरस्काराने चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

नोव्हेंबर मध्ये मुंबई येथे पंचतारांकित हॉटेल पनेसुला अंधेरी या ठिकाणी चित्रपट क्षेत्रातील अति सन्मानाचा समजला जाणारा दादा साहेब फाळके कोरोना योद्धा हा पुरस्कार दिग्गज मान्यवर यांच्या हस्ते मिळाला.सोबत ते रुख्मिनी चॅरिटेबल ट्रस्ट व आस्था अनघादि फौंउडेशन ,विविध संस्था यांचे मार्फत त्या सामाजिक कार्य देखिल करत असतात.या सन्मानाने वैशाली ताई चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.