हदगाव शहरातील दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ द्या – फेरोज खान महमद अली खान

25

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2फेब्रुवारी):- दिव्यांग सुधारीत कायदा २०१६ अन्वये दिव्यांगांना पाच टक्के घरकुल देण्याबाबतची तरतुद आहे परन्तु नगरपालिका हदगावकडुन अद्याप एकाही दिव्यांगांला घरकुल वितरीत केले नाही परीणामी आज दि १ फेब्रुवारी २०२१ रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान महमद अली खान यांनी आपल्या दिव्यांग शिष्टमंडळासह नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले.या निवेदनात फेरोज खान यांनी म्हटले आहे की शासनाच्या विविध घरकुल योजणेतुन हदगाव नगरपालिका हद्दितील दिव्यांगांना हक्काचे घरकुल देण्यात यावे तसेच जास्तीचे अर्ज आल्यास नगरपालिका हद्दितील मोकळ्या जागेत किंवा गायरान जमीनीवर दिव्यांग संकुलन बांधण्यात यावे जेणेकरून दिव्यांगांचे पुनर्वसन होईल कारण दिव्यांगत्वामुळे कुटुंबातील सदस्य हि त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत.

त्यांना कोणीच पाहत नाही त्यामुळे त्यांचे संगोपन आणि सांभाळ सुद्धा होत नाही परावलंबत्वाचे धोरण अवलंबिले जाते एवढेच काय तर दिव्यांगत्वामुळे त्यांचे विवाह सुद्धा जुळुन येत नाहीत हाती खुप सार्या कला असतांना देखील तो स्वंयरोजगारापासुन कोसो दुरच राहतो त्यामुळे सर्व प्रथम त्यांचे पुनर्वसन होने गरजेचे आहे आणि त्यासाठी हक्काचे घरकुल देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविने काळाची गरज आहे जेणेकरून स्वताच्या हक्काचे घर मिळताच वरील सर्व प्रश्न सोडविण्यास दिव्यांग सक्षम बनेल आणि अशा प्रकारचे धाडसी निर्णय महानगरपालिका नांदेड कडुन घेण्यात आले असल्याचे आणि मनपा हद्दीतील दिव्यांगांकडुन अर्ज मागविले जात असल्याचे फेरोज खान महंमद अली खान यांनी म्हटले आहे.तसेच या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड.जिल्हा प्रशासन अधिकारी.नांदेड आणि तहसिलदार हदगाव यांना देण्यात आले आहे.

या निवदणवार फेरोज खान महमद अली खान यांच्यासह निहाल पटेल,गजानन सिंगने,धुरपतराव सुर्यवंशी, नासेर शे.युसुफ.शबीर बेग हासीर बेग, गंगाराम गायकवाड,फयमोदिन सरवरी.राधाबाई जाधव आणि शेख शबाना हासनबी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.