प्रत्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांपुढे अडचणी मांडण्याची संधी

34

🔹गोंडवाना विद्यापीठाद्वारे “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय गडचिरोली द्वारे विशेष पोर्टलची निर्मिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.2फेब्रुवारी):-महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागामार्फत ” उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ गडचिरोली ” हा उपक्रम दिनांक 4 फेब्रुवारी 2021 सकळी 12.00 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी ,पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी-अडचणी ऐकून घेऊन सोडविणार आहेत.

गोंडवाना विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.unigug.ac.in या वेवसाईटच्या मुख्य पृष्ठावर ” उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@गडचिरोली ” हे विशेष पोर्टल निर्माण केलेले आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहे. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना आपली निवेदने ऑन लाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाईन निवेदन सादर करणे शक्य होणार नाही . त्यांनाही उपस्थित राहून मा. मंत्री महोदयांना आपले निवेदन सादर करता येणार आहे.

लींक https://unigug.ac.in/hte/index.php