सक्षम मानेच्या पालकांनी संपर्क करा – अधीक्षक राजु ब्रिद्रेवाडी यांचे आवाहन

26

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.२फेब्रुवारी):- इचलकरंजी येथील नवचैतन्य बालगृहातील सक्षम मानेच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन अधीक्षक राजु ब्रिद्रेवाडी यांनी केले आहे.
बाल कल्याण समिती, कोल्हापूर येथून सक्षम माने हा इचलकरंजी येथील नवचैतन्य बालगृहात बदली आदेशानुसार दाखल आहे. बदली दाखल दिनांकापासून आजतागायत सक्षम यास भेटण्यास अथवा सुट्टीवर घेऊन जाण्यास कोणीही नातेवाईक आलेले नाहीत.

त्यांच्या पालकांपैकी कोणी असल्यास नवचैतन्य बालगृह, इचलकरंजी, यशवंत रेसिडेन्सी, सांगली रोड, इचलकरंजी यांच्याशी प्रसिध्दी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत संपर्क साधावा. मुदतीत कोणाचा बालकाप्रती पालक असल्याचा दावा न आल्यास कारा गाईड लाईननुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही ब्रिद्रेवाडी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.