आठवडी बाजार पूर्ववत सुरू करा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.3फेब्रुवारी):- चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठ पैकी एक असणाऱ्या ब्रम्हपुरी येथील शुक्रवारी आठवडी बाजार ब्रम्हपुरी नगर परिषदच्या अनागोंदी कारभारामुळे बंद झाले झाले आहे.त्यामुळे ब्रम्हपुरी शहरातील नागरिककांसोबतच तालुक्यातील ९० गावातील खरेदीदार-विक्रीदार शेतकऱ्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परिणामी भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे शेतकरी,लहान हॉटेलवाले, व्यापारी तसेच स्थानिक दुकानदारांना आर्थिक फटका बसत आहे.

वास्तविक ब्रम्हपुरी शहर सोडुन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार नियमितपणे सुरू झाले असुन ब्रम्हपुरी येथील शुक्रवारी आठवडी बाजार पूर्ववत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष वासुदेवभाऊ सोंदरकर.जगदीश भाऊ पिलारे, रा. यु. काँ. तालुका अध्यक्ष अश्विन उपासे, रा.यु. काँ. शहर अध्यक्ष पराग बनपूरकर रा. काँ.सा. व न्याय. तालुका अध्यक्ष प्रवीण (सोनू) गेडाम व इत्यादी कार्यकर्त्यांना लावून धरली असता, नगर परिषदेच्या जनरल मीटिंग मध्ये एक मताने मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED