विविध मागण्यांसाठी गेवराई नगरपरिषदसमोर उपोषण सुरू

    37

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    गेवराई(दि.4फेब्रुवारी):-शहरातील वडार समाजाच्या स्मशानभुमीचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी निधी न देणार्‍यांचा निषेध करत वडार समाजाच्या वतीने स्मशानभुमीसह विविध मागण्यांसाठी अंदोलन सुरु केले आहे. यावेळी वडार समाजाचे गेवराई तालुकाध्यक्ष सुभाष गुंजाळ यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती आहे.गेवराई शहरातील संजयनगर भागात वडार समाज मोठ्या संख्येने असुन त्या समाजासाठी गेवराई शहरामध्ये स्मशानभुमी उपलब्ध नसल्यामुळे समाजाला अंत्यविधी करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत.

    वडार समाजामार्फत यापुर्वीही संजयनगर भागातील वडार समाज वास्वव्यास असलेल्या भागामध्ये रस्ता, लाईट, विंधन विहीर आदी मुलभूत गरजांच्या पुर्तर्तेसाठी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती. परंतू अद्यापपर्यंत या निवेदनाची दखल नगर परिषद व तहसिल प्रशासनाने घेतलेली नाही. वडार समाजाला नगर परिषदेच्या हद्दीमध्ये गट क्र. ५८० (अ) मध्ये स्मशानभुमीसाठी २० गुंठे जमीन असुन त्या ठिकाणी स्मशानभुमीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत.

    सदरील ठिकाणी स्मशानभुमीसाठी संरक्षक भिंत, विंधन विहीर, रस्ता व लाईट ची सोय नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. वडार वस्तीमध्ये विविध विकास कामांची तसेच स्मशानभुीमधील कामांची वारंवार मागणी करुनही अद्याप पर्यंत त्याची नोंद घेण्यात आलेली नाही. संजयनगर भागातील वडार समाजाच्या वतीने सदरील मागण्यासाठी तहसिलदार, मुख्याधिकारी यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले होते मात्र या मागणीची दखल न घेतल्याने नगर परिषदेसमोर दि. १ फेब्रुवारी रोजी पासून वडार समाजाच्या वतीने अमरण उपोषणा सुरु करण्यात आले आहे.