वंचित बहुजन आघाडी माण तालुका अध्यक्ष पदी मा.युवराज भोसले यांची निवड

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.4फेब्रुवारी):-वंचित बहुजन आघाडीचा सातारा जिल्हा दौरा दिनांक-२० जानेवारी ते १७फेब्रुवारी सन २०२१ दरम्यान तालुका निहाय कार्यकारिणी स्थापन करणे संदर्भात जाहिर करणेत आला होता.

त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक-०१/०२/२०२१रोजी वि.का.स.सेवा सोसायटी हॉल दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष-मा.चंद्रकांत खंडाईत(आप्पा)यांचे मार्गदर्शनाखाली.जिल्हा उपाध्यक्ष-मा.बाळकृष्ण देसाई,मा.सुभाष गायकवाड सातारा जिल्हा संघटक-मा.इम्तियाज नदाफ,मा.चंद्रकांत खरात सातारा जिल्हा निरीक्षक-मा.दादासाहेब कांबळे,मा.अजित साठे,यांचे प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते मा.युवराज बबन भोसले रा.बिजवडी, तालुका माण, जिल्हा सातारा यांची माण तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या वेळी शिव,शाहू,फुले, आंबेडकर विद्वत्त सभा सातारा जिल्हाध्यक्ष-मा.अशोक भोसले, माजी सभापती पं.स.माण-मा.बाळासाहेब रणपिसे,महिला आघाडीच्या चित्रा गायकवाड, प्रियंका जाधव, माण तालुका युवक आघाडी अध्यक्ष-मा.रणजित सारतापे , मा.संभाजी लोखंडे, दहिवडी शहर अध्यक्ष-मा.राजेंद्र आवटे व माण तालुका वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंगचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष युवराज भोसले बोलताना म्हणाले आज वंचित बहुजन आघाडी च्या माण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आप्पा यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्या वरती जी तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे आणि सक्षम पणे पार पाडणार असून तालुक्‍यात जास्तीत जास्त शाखा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी जोडणार आहे.

वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढत असून प्रत्येक जिल्ह्यात वंचित चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपली संपूर्ण ताकद पक्षासाठी लावत असून पक्ष हा या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात वाढत आहे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रात तिसरा पर्याय असल्याशिवाय राहणार नाही.