भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी अॅड.सौ.धनश्री तारा खटके-पाटील

26

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.6फेब्रुवारी):-आज टेंभूर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर , भारतीय जनता पार्टीच्या, जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये
अॅड_सौ_धनश्री_ताई _खटके_पाटील यांची ” सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा ” #जिल्हा_अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हा अध्यक्ष मा. श्रीकांत दादा देशमुख यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी चे माढा तालुका अध्यक्ष मा. योगेश बाबा बोबडे, जिल्हा कोषाध्यक्ष मा.चंदूकाका पाटील, मा.सुरज ढवळे पाटील,विष्णु बिचकुले मा.भाऊसाहेब महाडिक, मा. गिरीश ताबे, मा. बाळासाहेब ढगे, मा.उमेश पाटील, मा.भारत साळुंखे, मा.विजय भाऊ कोकाटे, मा. सुभाष बापू इंदलकर मा राहुल चव्हाण.सुधीर गाडेकर, मा.मदन मुंगळे मा.औदुंबर भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.