बीड येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात गंगाखेड संघ विजयी

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

बीड(दि.8फेब्रुवारी):- क्रिकेट संघटना व प्रसिडेंट इलेव्हन यांच्या विद्यमाने मल्टिप्रपज मैदान बीड या ठिकाणी पंधरा वर्षाखालील मुलांचे लेझर क्रिकेट सामन्याचे आयोजिन करण्यात आले होते. दिनांक 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान हे सामने खेळवले गेले. अंतिम सामना रायझिंग क्रिकेट अकॅडमी गंगाखेड विरुद्ध प्रेसिडेंट बीड यांच्या झाला. त्यात रायझिंग क्रिकेट अकॅडमी गंगाखेड याने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. विजयी संघाला 21 हजार रोख व चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात. या स्पर्धेत महाराष्ट्रातुन एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदवला होता.

राजझिंग क्रिकेट अकॅडमी गंगाखेड यांचे संत जनाबाई शिक्षण प्रसारक मंडळ गंगाखेड यांच्या वतीने संत जनाबाई महाविद्यालय या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विजयकुमार शिंदे, उपाध्यक्ष डॉ.आत्माराम टेंगसे, प्राचार्य डॉ. बी. एम. धुत, उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे, क्रीडा संचालक प्रा.डॉ.चंद्रकांत सातपुते, पंडितराव चौधरी, प्रशिक्षक वेदांत महाजन विजय बहोत व विजयी खेळाडू यावेळी उपस्थित होते.