रेशनकार्ड धारकांना राज्यातील कोणत्याही स्वस्तधान्य दुकानामधुन धान्य द्या- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर

29

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.10फेब्रुवारी):-राज्यातील काही नागरिक आपल्या उदारनिर्वाह, करण्यासाठी स्वतःच गांव, जिल्हा,सोडून परगावी जात आहेत,त्यामुळे त्यांना आपल्या नोंदणी स्वत धान्य दुकानापासुन धान्य ,राशन,उचलता येत नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या परिवाराला उपासमारीचा सामना करावा लागत आहे, रेशनकार्ड धारकांना राज्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानामधुन धान्य मिळण्याची तरतूद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री मा. छगन छगनजी भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे,रेशनकार्ड धारक, म्हणजे,एक कष्टकरी,गरीब कुटुंब आहे.

या वाढत्या माघाईमुळे, त्रस्त झालेला वर्ग,आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी, स्वतःच्या गांवात हाताला काम नसल्याने राज्यातील कित्येक रेशनकार्ड धारक आपले स्वतःच गांव जिल्हा सोडून बाहेरगावी जात आहेत वास्तू साठी लागणारी विट बनवण्याचं काम,उसतोडणी, बांधकाम, शेतीतील कामे, शहरातील,खाजगी कंपनीमध्ये काम,अस्या विविध क्षेत्रात रात्रंदिवस मजुरी करून संसाराचा गाडा चालवत आहेत,अस्या अडचणी मध्ये असलेल्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याने,त्यांची व त्यांच्या परिवाराची उपासमारीची वेळ आली आहे,त्वरित शासनाने रेशनकार्ड धारकांना राज्यातील कोणत्याही दुकानामधुन धान्य मिळावेत अशी त्वरित तरतूद करून रेशनकार्ड धारकांना दिलासा दिला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले,