✒️रायगड(पुरोगामी संदेश नेटवर्क)
रायगड(दि.11फेब्रुवारी):-कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा रमाईच्या १२३ व्या जयंतीनिमित्त रमाईची लेक या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रामधे उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोकण प्रदेश महिलाध्यक्षा दिपीका चिपळूणकर यांना रमाईची लेक हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मोरे तर प्रमुख अतिथी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबन कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार, संस्थेचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष चंद्रकिरण सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला कायदेविषयक सल्लागार अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ‘रमाईची लेक ‘ या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोकण प्रदेश महिलाध्यक्षा दिपीका चिपळूणकर यांना रामदास आठवले यांच्या हस्ते ‘रमाईची लेक ‘ हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने दिपीका चिपळूणकर यांचे अभिनंदन करण्यात आले.