महिलांनी माता रमाई सारखे स्वाभिमानी जीवन जगणे गरजेचे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

37

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.11फेब्रुवारी):– त्यागमूर्ती माता रमाई नि आपल्या घरसंसार चालवण्यासाठी खूप हालअपेष्टा सहन केल्या पण डगमगली नाही शेनाच्या गवऱ्या थापून एक एक पैसा पैसा जमा केला व बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पुरवत गेल्या फार उदार अंतःकरण स्वच्छ चरित्र ,राहणी साधी फार बुद्धिमान होत्या म्हणून रमाई माऊली ही नवकोटी माता झाली बाबासाहेबांना फार हळव्या मनानी समाजाचे दुःख समस्या सांगत होत्या कुठलाही अहंकार त्यांच्या जवळ नव्हता समाजच आपले कुटुंब आहे म्हणून बाबासाहेबांच्या सोबतीला खंबीरपणे उभ्या राहिल्या बाबासाहेबांच्या लढाई त सहभागी झाल्या समाजाचे हित साधले भारतीय संविधान रमाई माऊलीच्या त्यागामूळे मिळाले एक वेगळी क्रांती तयार होऊन समाजाला प्रकाशमान केले एवढ्या तुटपुंज्या पैस्या मंध्ये स्वाभिमानी जीवन जगून आपला घरसंसार रमाई नि चालविला तो आदर्श प्रत्येक महिला नि घेऊन स्वाभिमानाणी व सन्मानाणी जीवन जगणे फार गरजेचे आहे.

अश्या ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे ह्या शंकरपूर येथील रमाई जयंती निमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शंकरपूर ग्राम पंचायत सदस्य यशकला ढोक ह्या होत्या तर प्रमुख पाऊने म्हणून सुधा भसारकर प्रमुख मार्गदर्शक समतादूत प्रज्ञा राजूरवाडे ह्या होत्या पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणल्या की महिलांनी आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे व आपल्या लघु व्यवसायातून आपली प्रगती साधने महत्वाचे आहे लोकांची गुलामी करणे कोणच्या घरचे भांडी धुनी व पोचा मारणे ही कामे बंद करावी व समाजांनी सुद्धा गरीब कुटुंबाचा आर्थिक विकास कसा साधता येईल यासाठी भर द्यावा रमाई माऊली नि जो त्याग जे दुःख समाजासाठी सहन केले आपल्या सर्वासाठी कण कण रमाई माऊली झिजली तिने भोगलेले दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून आज सर्वांच्या जीवनात सुख व आनंद आहे पण अजूनही बाबासाहेबांना व रमाई मातेला अपेक्षित असलेला समाज निर्माण झाला नाही म्हणून आज आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे आवश्यक आहे अश्या त्या म्हनाल्या या कार्यक्रम चे संचालन माया ढोक यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी रमाई महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले