रामदेगी -संघारामगिरी मोकळी करा अन्यथा ताडोबा पर्यटन बंद पाडू -प्रा. जोगेंद्र कवाडे

28

🔹साडेतीन किलोमिटर पायदळ मार्च मध्ये “खुले कर दो रास्ते- भन्तेजी के वास्ते” घोषणेचा गजर

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

शेगाव(दि.13फेब्रुवारी):-संघारामगिरी (रामदेगी) मुक्तीसाठी जिल्ह्यातील तथा जिल्ह्या बाहेरील हिंदू आणि बौद्ध समाजाचे अनुयायी भदंत महाथेरो ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वाखाली अबालवृद्ध, महिला, युवक रस्त्यावर उतरून वनविभागाच्या विरुद्ध गुजगव्हान ते संघरामगिरी साडेतीन किलो मीटर पायदळ मार्चमध्ये सहभागी झाले.

पुरातन काळापासून रामदेगी व संघरामगिरी येथे हिंदू व बौद्ध बंधावचे धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे याठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, वन विभागाच्या गुरुप्रसाद या अधिकाऱ्याच्या दडपशाहीमुळे या परिसरात नागरिकांना त्याचे धार्मिक विधी करण्यासाठी बंदी घालण्यात आली. ३० व ३१ जानेवारीला झालेल्या धम्म समारंभास जिल्हाधिकारी यांची परवानगी असतानाही मंडप डेकोरेशनचे वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली होती. तर रामदेगी देवस्थानचे सचिव हनुमंत कारेकर यांनी वरोरा न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाने सुद्धा नागरिकांना परवानगी दिली.

मात्र, वनविभागाने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करीत नागरिकांना रामदेगी येथे जाण्यासाठी परवानगी नाकारली. यामुळे आंदोलकांनी या अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. वन विभागा विरोधातील या भव्य दिव्य आंदोलनात पीरिपाचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.जोंगेद्र कवाडे, कमलताई गवई , माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, वंचितचे राज्य महासचिव राजु झोडे, राष्ट्रवादीच्या वर्षा शामकुडे, चिमूर विधानसभा काँग्रेस समन्वयक तथा जिल्हा परीषद सदस्य डॉ. सतिश वारजुरकर, बिरसा ब्रिगेडचे सतिश पेंदाम, वंचितचे अरविंद सांदेकर, हनुमंत कारेकार , शेर खान पठाण, गोंविदा महाराज व भिख्कु संघ
उपस्थित होते.

सुलेखा कुंभारे , वर्षा शामकुळे यांचे ‘खुले कर दो रास्ते- भन्तेजी के वास्ते’ या नार्‍याने तथा दडपशाही करणाऱ्या वनाधिकारी गुरुप्रसाद यांना आंदोलन स्थळी अणावे अन्यथा आम्ही हटणार नाही तथा नेहमी करीता रामदेगी गेट खुले करावे या आंदोलकाच्या मागणीने तणाव वाढला होता मात्र सहाय्यक पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांचे मध्यस्थीने तणाव निवळला.