शिवजयंती वर जाचक अटी टाकलेल्या शासन निर्णयाची उमरीत होळी

28

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.13फेब्रुवारी):- महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध जगाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती वर कोरोणाचे कारण दाखवून महा विकास आघाडी सरकारने निंर्बंध घालत असून त्या अटींच्या शासन परिपत्रकाची उमरी येथे शिवभक्ता कडून होळी करण्यात आली आहे.
दरवर्षी शिवजयंती मोठ्या हर्षोल्हासात व धूमधडाक्यात सगळीकडे साजरी होते परंतु महाविकास आघाडी सरकारने यंदा शिवजयंती वर निर्बंध आणत मोठमोठ्या जाचक अटी टाकून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.

तसेच कोरोना हा रोग फक्त शिवजयंती पुरता आहे का बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभा राहतो तिथे लाखो लोक जमा होतात त्यावेळी हा कोरोणा सुट्टीवर असतो का नाना पटोले पदग्रहण करतात तिथे हजारो लोक जमा होतात त्यावेळी हा करणा रोग झोपी जातो का अशा भावना प्रेमिकांच्या असून लवकरात लवकर शासनाने शिवजयंती वरील सर्व नियम हटवावेत अशी मागणी समस्त शिवभक्तांची आहे.

महा विकास आघाडी विरोधात घोषणा देत शिवप्रेमीकांनी शासनाने काढलेल्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला व हे नियम न हटवल्यास उमरी मार्केट बंद करू असा इशाराही दिला.यावेळी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष योगेश पाटील मोरे युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष अविनाश पाटील हिवराळे मराठा मावळा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा पाटील तांदळे योगेश पाटील जाधव कैलास पाटील उमरे अमित पटकुटवार आकाश अचकुलवार यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते