अश्लेषा बारसिंग हिची राष्ट्रीय जूनियर कौशल्य विजेता स्पर्धेसाठी निवड

    44

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

    म्हसवड(दि.13फेब्रुवारी):-कुमारी आश्लेषा बारसिंग हिची राष्ट्रीय स्तरावर संपन्न होणाऱ्या जूनियर कौशल्य विजेता स्पर्धेसाठी नवोदय विद्यालय सातारा यांचेमार्फत या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

    आश्लेषा सध्या इयत्ता सातवीत शिकत असून कलाकौशल्य, गायन, वक्तृत्व यात विशेष आवड असून तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिच्या आई-वडिलांचे पाठिंब्यामुळे आज राष्ट्रीय स्पर्धेत जाण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.

    यासाठी नवोदय विद्यालय सातारा या शाळेचे प्राचार्य श्री. रवींद्र लाड सर, वर्गशिक्षिका माधुरी पुराणिक आणि श्री. प्रशांत हरदास सर यांचे विशेष आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले या मार्गदर्शनातूनच आज तिची राष्ट्रीय स्तर स्पर्धेत निवड झाली.