रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण

29

अक्कलकोट(दि.16फेब्रुवारी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसिल कार्यालय अक्कलकोट येथे रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळु देण्यात यावे,वाळु उपलब्ध नसल्यामुळे अनेक बांधकाम अपूर्ण परीस्थित असुन त्यामुळे बांधकाम मिस्त्री व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तरी तालुक्यातील नदीकाठच्या ठिकाणची वाळु लिलाव लवकरात लवकर काढुन वाळु उपलब्ध करून देण्यात यावे,पूरग्रस्त शेतकऱ्यांना आद्यपही नुकसान भरपाई मिळाली नाही तरी ती त्वरित वितरित करण्यात यावे,श्रावण बाळ योजना व निराधार योजनाच्या लाभार्थ्यांना अनुदान त्वरित वाटप करण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी
*आमरण उपोषण* राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरवात करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड, जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,शहर अध्यक्ष प्रसाद माने,यु ता अध्यक्ष अप्पा भालेराव,विजयकुमार पोतेनवरू,अंबादास गायकवाड, रवी सलगरे,चंद्रकांत गायकवाड,मंजुनाथ बनसोडे,शुभम मडिखांबे,आकाश मडिखाबे,अंबादास शिंगे,सुरेश सोनकांबळे, तम्मा धसाडे, परमेश्वर आयवळे, प्रशांत मडिखांबे,सुरेश वसोनकांबळे, शिवानंद धोडमणी, संगोळगी सरपंच बसुराज निम्मे,कृष्णा धोडमणी रमेश धोडमणी,गुंडु कांदे शिवराज जमगे श्रीकांत गायकवाड नागेश मडिखाबे व अन्य उपस्थित होते