आर आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण

  38

  ?जिल्हा सुंदर गाव स्पर्धेत माकोडी गावाला पारितोषीक

  ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

  बुलडाणा(दि.16फेब्रुवारी):- आर. आर. (आबा) पाटील यांचे पुण्यतिथी निमित्ताने आज 16 फेब्रुवारी रोजी सन 2019-20 अंतर्गत तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. मनिषाताई पवार, उपाध्यक्ष सौ. कमलताई बुधवत, सभापती रियाजखॉ पठाण, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पं.स मोताळा सभापती प्रकाश बस्सी आदी उपस्थित होते.

  याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार म्हणाल्या, या स्पर्धेत सहभाग नोंदवित पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतींपासून अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घ्यावी. पुढील वर्षी आपली ग्रामपंचायतीला कसे पारितोषिक मिळेल, यादृष्टीने काम करावे. ग्राम विकासाच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतींनी आपली ग्रामविकासातील भूमिका अधोरेखीत करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले. त्यांनी स्पर्धेची माहिती दिली.

  सन 2019-20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव स्पर्धेतील पारितोषिक विजेते ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या पुरस्कार योजनेतंर्गत राज्य शासनाकडून तालुका सुंदर गाव करीता 10 लक्ष रूपये व जिल्हा सुंदर गाव करीता 40 लक्ष रूपये पारितोषिक घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार पारितोषिक विजेत्या गावांना पारितोषिक रक्कमेचा धनादेश देण्यात आला. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सहा. गट‍ विकास अधिकारी भरत हिवाळे यांनी केले.

  ह्या ग्रामपंचायती आहेत विजेत्या

  जिल्हा सुंदर गाव पुरस्कार विजेती ग्रामपंचायत : माकोडी ता. मोताळा, तालुका सुंदर गाव पारितोषिक विजेत्या ग्रामपंचायती : बुलडाणा – हतेडी खु, चिखली – सावरगांव डुकरे, दे. राजा- खल्याळ गव्हाण, सिं. राजा- आडगांव राजा, मेहकर – आंध्रुड, लोणार – आरडव, खामगांव – वझर, शेगांव – खातखेड, संग्रामपूर- उमरा, जळगांव जामोद- सुनगांव, नांदुरा – खुमगांव, मलकापूर – विवरा, मोताळा – माकोडी.