भव्य पुस्तक प्रकाशन व ग्रंथतुला सोहळा संपन्न

32

✒️परभणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

परभणी(दि.19फेब्रुवारी):- मयुर जोशी लिखित अत्यंत भावस्पर्शी, हृदयस्पर्शी ललित साहित्य संग्रह ‘भावस्पर्शी मयूरविचार’ आणि ‘आसवांची स्पंदने’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा अत्यंत आगळ्यावेगळ्या स्वरूपात संपन्न झाला. चि. भक्तेश व चि. रितेश यांच्या ‘उपनयन संस्काराचे’ औचित्य साधून मातृत्व-पितृत्वाचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी चांदजकर परिवारातर्फे आपल्या आई- वडिलांची (श्री वसंतराव बाबुराव चांदजकर व सौ जान्हवी वसंतराव चांदजकर यांची) ग्रंथतुला करण्यात आली.

या भव्य पुस्तक प्रकाशन व ग्रंथ तुला सोहळ्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा श्री महेश भाऊ आकात, सुप्रसिद्ध किर्तनकार श्री ह भ प बाळू महाराज गिरगावकर, सुप्रसिद्ध किर्तनकार श्री ह भ प दीपक महाराज जोशी पांगरेकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. उपनयन संस्कारासारख्या घरगुती कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन व ग्रंथतुला यासारखा वैविध्यपूर्ण सामाजिक उपयुक्ततेचा कार्यक्रम आयोजित करून चांदजकर परिवाराने समाजापुढे नवीन आदर्श ठेवला आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक परिवाराने आयोजित केले पाहिजेत. यासारख्या कार्यक्रमातून मात्यापित्यांच्या सन्मान करणे व वाचन संस्कृती जपणे हा संदेश मिळतो.