छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्यपद्धती आपल्या दैनंदिन कामकाजात आचरणात आणावी -जिल्हाधिकारी सुरज मांढरे

24

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

नाशिक(दि.20फेब्रुवारी):-‍छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही त्यांच्या कार्यातून उमटून दिसते. सर्वांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भ ग्रंथांचे वाचन करून शिवाजी महाराजांची कार्यपद्धती आपल्या दैनंदिन कामकाजात आचरणात आणावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितिन गावंडे, तहसीलदार दिपक पाटील,पल्लवी जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.