ब्रम्हपूरी तालुक्यातील किन्ही या गावी दिनांक 25 फेब्रुवारी 2021रोजी रोजगार संघाचे मार्गदर्शन

30

🔹गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षा,रोजगार ,आदर्श ग्राम निर्मीती यावर मार्गदर्शन करण्यात आले

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपूरी(दि.27फेब्रुवारी):- तालुक्यातील किन्ही या गावी दिनांक 25 फेब्रुवारी 2021रोजी रोजगार संघाचे मार्गदर्शक प्रा.मिलिंदजी सुपले,सरचिटणीस उद्धवजी साबळे यांनी भेट दिली आणि गावातील तरुणांना स्पर्धा परीक्षा,रोजगार ,आदर्श ग्राम निर्मीती यावर मार्गदर्शन करण्यात आले. गावात नित्यनेमाने समुदायीक प्रार्थना सुरु असुन ग्रामपंचायत कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.येथील महिलांनी तिळसंक्रांतिला वानात आकर्षणाचा नियम,प्रेरक गोष्टी,सरपंच हितगुज ही पुस्तके भेट दिली.

गावात रोजगार संघाची स्थापना करण्याचा मानस व्यक्त करुन गाव सर्वांग सुंदर करण्याचा संकल्प आज गावकरी मंडळीनी केला. किन्ही चे सरपंच धीरगोपाल धोगडे,उपसरपंच आशीष प्रधान, चौघांन चे उप सरपंच अंकुश मातेरे,जुगनाडा चे उप सरपंच गोपाल ठाकरे,भगवानजी प्रधान,वसंतराव भर्रे,मधुकर ढोरे,प्रभुजी बगमारे,शाम पत्रे,पवार,जयमाला दिघोरे,वृदा आटे ,नवनाथ कुथे ,सौ,सुपले ताई,सौ.प्रधान ताई यांचे सह गावातील तरुण,तरुणी,गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होती.