शितलनाथ संस्थांच्या भक्तनिवास परिसरात घाणीचे साम्राज्य , ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

84

🔹शितलनाथ संस्था ने बळसाणे तीर्थाचा काय विकास केला ; उपसरपंच महावीर जैन यांचा सवाल

✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

बळसाणे(दि.1मार्च):- जैन धर्मीयांचे चोवीस तीर्थांपैकी तेरावे तीर्थंकर विमलनाथ भगवान हे बळसाणे गावात विराजमान आहेत, गावाला बळसाणे म्हणून संबोधित करायचे परंतु इ.स. १९७९ साली स्मशानात विमलनाथ भगवानाची मुर्ती प्रकट झाली, तरी ही काही दिवस बळसाणे म्हणून च गावाचे नाव प्रचलित होते. दरम्यान देवलोक गमन झालेले परमपूज्य आचार्य भगवंत विद्यानंद सुरीश्वरजी महाराज व पंन्यासश्री कुलवर्धनश्रीजी महाराज यांच्या अथक परिश्रमातून बळसाणे गावाला प्रसिद्धी मिळाली आणि बळसाणे गावाचे बळसाणे तीर्थक्षेत्र म्हणून नवीन ओळख झाली.गावात विमलनाथाच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येत असतात, पुर्वी पासून तीर्थाचा कारभार शितलनाथ संस्था कडे असूनही त्यांचा च परिसराचा विकास खुंटला आहे. आजुबाजुचे परिसर घाणीचे साम्राज्या ने पुर्णतः घेरले आहे. त्याचबरोबर भक्तनिवासमध्ये भाविकांना जशी पाहिजे तशी सोय उपलब्ध होत नाही.

शितलनाथ संस्थांच्या मनमानी कारभारामुळे देवलोक गमन झालेले विद्यानंद सुरीश्वरजी या महाराजांनी गावापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर तीस एक्टर जमीन समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून खरेदी केली त्या जागेत नव्याने विमलनाथाचे जैन मंदिर उभारले, भाविकांची दिवसेंदिवस गर्दीत वाढ व्हायला लागली. सुसज्ज अशा भक्तनिवास तयार केली. समाजातून ट्रस्टगणांची अकरा लोकांची समिती तयार केली, आणि विश्वकल्याणक या तीर्थाचे झपाट्याने विकासाला सुरुवात झाली आज ही पर्यटक गावातील भक्तनिवासांचे सर्व्हे करून परत माघारी येऊन विश्वकल्याणक तीर्थावरच मुक्काम थांबणे, पसंत करतात शितलनाथ संस्थेने भक्तनिवास लगत घरे घेतली. घर जमीन दोस्त व्हायला साधारणतः पंधरा ते वीस वर्ष झालीत जागा मोकळी असल्याने त्याठिकाणी रहिवासी घाण विष्ठा टाकतात. त्यामुळे वराहांचे घर तयार झाली आणि झाडझुडपे वाढल्यामुळे डासांचे प्रादुर्भाव वाढले याकारणामुळे भाविकांची भक्तनिवासात गैरसोय व्हायला लागली.

भाविक गावातील मंदिराला देणगी मोठ्या प्रमाणावर देतात हे कुणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही आपल्या ताब्यात मोकळी जागा असून ही बळसाणे तीर्थक्षेत्राचा विकासाला हातभार का म्हणून लावला जात नाही. मग देणगी जाते कुठे असा सवाल बळसाणे ग्रामस्थ व तीर्थक्षेत्राचे उपसरपंच महावीर जैन यांनी केला आहे.गावातील भक्तनिवासात जैन साधुसंताची सुविधा निटनेटके पणाने होत नाही. परिसर व भक्तनिवास स्वच्छ केले जात नसल्याचा आरोप जैनयांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.अनेक वर्षापासून तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित राहिलेले आहे. भक्तनिवासाच्या प्रथमदर्शनी व मागच्या बाजूस साठलेली भरमसाठ घाण पहावयास मिळत आहे.

शितलनाथ संस्थांच्या जागेतील असणारी घाण , कचरा हा मोकळ्या जागेत टाकला जात असून त्या घाणीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे याला जबाबदार शितलनाथ संस्था च राहील असे मत जैन यांनी मांडले देणगी च्या मानाने पर्यटकांना सुविधा मिळत नसल्याची नाराजगी भाविकांकडून होत आहे.वर्षागणिक शितलनाथ संस्थेला करोडो रुपयाची देणगी प्राप्त होत असून देखील तीर्थाचा विकास मात्र झिरो आहे. महिन्यातून अध्यक्षासह ट्रस्टगणांनी दानपेटी फोडून बँकेत जमा करावयाचे कारस्थान ३५ वर्षांपासून चालू आहे. आत्ता गावकऱ्यांना गावाच्या विकासा ची ओढ लागली आहे.

गावकऱ्यांच्या उपस्थितीत शितलनाथ संस्थांच्या आजी अध्यक्षांची व समितीची बैठक घेऊन प्रश्नांचा भडीमार केला जाईल गावाचा कोणता विकास केला. काय केले तीर्थासाठी असा अनेक खुलासा जनतेला द्यावा अशी अपेक्षा बळसाणे वासियांना आहे.बळसाणे तीर्थक्षेत्र असल्याने मोठमोठे धार्मिक कार्यक्रम होतात. भाविकांची नित्यनियम रेलचेल राहते, पण समाजाच्या धार्मिक कार्यात स्वतः होऊन कधी ही दानराशी जाहीर करीत नसल्याची नाराजगी महावीर जैन यांनी व्यक्त केली आहे.