प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

29

✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पालघर(दि.1मार्च):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य पदाधिकारी, कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिला प्रदेशाध्यक्षा दिपीका चिपळूणकर, कोकण संघटक संजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नूकतीच जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष प्रा.राजेश संखे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व आय कार्ड प्रदान करण्यात आले.

पालघर जिल्हा कार्यकारिणी अशी : पालघर जिल्हाध्यक्ष प्रा.राजेश संखे, जिल्हा संपर्क प्रमुख श्री अमेय पिंपळे, जिल्हा संघटक सत्यवान तरे, जिल्हा समन्वयक अतुल वझे, जिल्हा सचिव शेखर पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोष कोरे, जिल्हा सरचिटणीस मुकेश सिंह, जिल्हा सरचिटणीस अजय घोडविंदे, जिल्हा सहसचिव संजोग संखे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.जितेंद्र सावे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री.परेश संखे आदी पदाधिका-यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उद्दिष्टाबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून यापुढे विविध उपक्रम राबविले जातील, यावर सर्वानी एकमताने सहमती दिली.