ऑल इंडिया पँथर सेनेची विधानभवन अधिवेशनावर धडक

26

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.5मार्च):- महाराष्ट्रात दलित अत्याचाराने थैमान घातले आहे. अरविंद बनसोड हत्याकांड, भीमराज गायकवाड हत्याकांड, विराज जगताप हत्याकांड, नांदेड लोहा गणेश येडकेवरील कुराड हल्ला प्रकरण, योगेश साळवे सुसाईड संस्थात्मक हत्या प्रकरण, इत्यादी शेकडो अत्याचार, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम मुलींवरील बलात्कार हत्या प्रकरण असे शेकडो हत्याकांड महाराष्ट्रात घडले आहेत घडत आहेत.
सामाजिक न्याय विभागाने अतोनात छळ केलेले आहेत. हक्काचा सामाजिक न्याय तर मिळत नाही परंतु अन्याय सुरू आहे. अट्रोसिटी ऍक्ट पीडितांचा निधी या राज्यात मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीय कोरोना वर्षोनवर्षं वाढत चालला आहे त्याची तीव्रता वाढत असून त्याला रोखण्याचा कसलाही प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत नाही. सरकारने आजपर्यँत अनुसुचित जाती जमातीच्या प्रश्नांवर अत्याचारावर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात दलित अत्याचार वाढत आहेत. मागासवर्गीय वर्गात संतापाची लाट पसरली आहे. कधीही याचा उद्रेक होईल एवढी चीड निर्माण झालेली आहे. बौध्द, आदिवासी, मातंग, अनुसूचित जाती जमातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

🔹ऑल इंडिया पँथर सेनेने पुढील मागण्या केल्या आहेत.

1) शिवनी जामगा, लोहा, नांदेड येते बौद्ध कुटुंबावर सशस्त्र हल्ला करण्यासाठी आलेल्या जातीय गुंडांना रोखण्यासाठी गेलेल्या गणेश येडके या बौद्ध तरुणाच्या डोक्यात कुराडीचा घाव केला तो औरंगाबाद रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तात्काळ त्याचा इलाज मोठ्या दवाखान्यात करून त्याला २५ लाखांची मदत करून गणेश येडकेला वाचवावे.

2) नाशिक बौद्ध योगेश हिवाळे या सामाजिक कार्यकर्त्याला भद्रकाली पोलीस स्टेशन वराडे नामक अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने सुसाईड केलं हे त्यांनी सुसाईड करण्याच्या आधी क्लिप करून सांगितलं ही संस्थात्मक हत्या आहे तात्काळ संबंधित आरोपींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे व हिवाळेच्या कुटुंबाच पुनर्वशन झाले पाहिजे.

3) ३५००० बौद्ध तरुणांवर भीमाकोरेगाव दंगलीच्या नावाखाली कोंबिंग करत खोटे गंभीर गुन्हे दाखल केले हे पाप फडणविस सरकारने केले. महाविकास आघाडी सरकारने आश्वासन दिले होते गुन्हे मागे घेऊ आजपर्यंत गुन्हे मागे घेतले नाहीत, तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत.

4) सामाजिक न्याय विभागातील हक्काचं बजेट इतरत्र वळवले जात असून अट्रोसिटी ऍक्ट पीडितांचे पैसे सुद्धा मिळत नाहीत. तात्काळ १००% हक्काचा निधी देऊन पीडितांचा निधी देण्यात यावा. रमाई घरकुल योजनेचा निधी देण्यात यावा, दादासाहेब सबलीकरण योजना १००% राबवावी.

5) स्वाधार योजनेचा निधी, बार्टीचा निधी, शिष्यवृत्तीचा निधी तात्काळ देण्यात यावा. महात्मा फुले विकास महामंडळाचे आजपर्यंतचे सर्व कर्ज माफ करण्यात यावेत.

6) २०२० पर्यंत अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे कराव्यात व तात्काळ सातबारा देण्यात यावा. गायरान जमिनी हिसकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे तात्काळ थांबवावे.

7) वर्षभरातील सर्व दलित अत्याचारातील प्रकरणे फास्टट्रॅक कोर्ट अंतर्गत चालवून आरोपींवर कठोर कार्यवाही करावी. जमिनावर सुटलेल्या आरोपींना तडीपार करावे मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी.

8) अट्रोसिटी ऍक्ट प्रकरणातील पीडित, साक्षीदार यांना प्रकरण संपेपर्यंत कायम पोलीस संरक्षण देण्यात यावे.

9) जळगाव येथील मुलींच्या वसतिगृहातील नग्न नृत्य प्रकरण संतापजनक आहे. यातील सर्व आरोपींवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही लावावेत व मुलींचे रक्षण करावे.

10) पेण रायगड २.५ वर्षीय मुलीवर बलात्कार हत्या प्रकरण, बिलोली नांदेड दलित मूकबधिर मुलीवर बलात्कार हत्या प्रकरण, तेल्हारा अकोला बलात्काराचा प्रयत्न केला मुलीने आत्महत्या करून स्वतःला संपवलं, जामनेर जळगाव मातंग मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला २ महिन्याची प्रेग्नन्ट अल्पवयीन मुलीने फाशी घेतली, ग्रहमंत्र्यांच्या मतदारसंघात १२ वर्षाच्या आदिवासी मुलीवर बलात्कार, भोकर तालुक्यात ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार हत्याकांड, सातारा होलार समाजाच्या मुलीवर अत्याचार करून विहिरीत फेकलेलं हत्याकांड, दलित आदिवासी मुलींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

यातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. बेटी वाचवण्याचा नारा इतिहास जमा न करता तिला वाचवण्याचा अजेंडा सरकारने तात्काळ हाती घ्यावा.सदरील संतापजनक हल्ल्यांमुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनुसूचित जाती जमातीला निघलेट करण्याच्या भूमिकेतून बाहेर या अन्यथा रस्त्यावरच्या आंदोलनात्मक संघर्षाला महाराष्ट्रात सुरवात होईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेना देत आहे.