केत्तूर येथे महास्वराज्य अभियान राबवावे

    39

    ?दिपाली ताई डिरे यांची तहसीलदारांकडे मागणी

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.5मार्च):-केत्तूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. दिपाली ताई डिरे यांनी केत्तूर ता. करमाळा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे महास्वराज्य अभियानाचे आयोजन करण्यात यावे असे निवेदन मा. तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले.

    यावेळी दिपाली ताई म्हणाल्या की केत्तूर गावामध्ये बर्याच लोकांकडे शिधापत्रिकाशिधापत्रिका नाहीत, कुणाला रेशन मिळत नाही, तर संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांमध्ये पात्र ठरतील असे बरेच जेष्ठ नागरिक आहेत. परंतु ते तालुक्याच्या ठिकाणी जावू शकत नाहीत. त्यामुळे महास्वराज्य अभियानाचे आयोजन गावातच केले तर या सर्व शासकीय योजनांचा लाभ गावातूनच मिळवता येईल.