महाराष्ट्र प्रांंतिक तैलिक युवा महासभा प्रदेश महासचिव पदी नरेंद्र चौधरी यांची निवड

33

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.5मार्च):-नाशिक – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास जी तडस, महासचिव डॉ. भूषण जी कर्डिले, कोषाध्यक्ष मा. गजाननजी शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर यांनी प्रदेश महासचिवपदी नरेंद्र बारकू चौधरी(धुळे) यांची निवड करून त्यांच्यावर समाज संघटनेची जबाबदारी नाशिक येथे सोपविण्यात आली.

यावेळी डॉ. भूषणजी कर्डीले यांनी समाज विकास व संघटन विषयी मार्गदर्शन करुन समाज सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाला पाहिजे युवकांनी जबाबदारी स्विकारावी तर कोषाध्यक्ष मा.गजाननजी शेलार यांनी व्यवसायात समाज बांधवांनी आणखी पुढे येवून एकमेकांना सहकार्य करावे अश्या अपेक्षा व्यक्त केल्या तर कोरोना संकटामुळे २८ फेब्रुवारी २०२१ स्थगित झालेला मेळावा कोरोना संकट गेल्यावर अतिभव्य स्वरूपात होणारच असेही यावेळी सांगितले.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेच्या राज्य पातळीवरील महासचिव सारख्या जबाबदार व महत्त्वाच्या पदावर धुळे जिल्ह्यातील युवकांस प्रथमच संधी मिळाली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे संपूर्ण राज्य भरात भरभक्कम संघटन असून समाज विकासासाठी नेहमीच जागरूक व कटीबद्ध आहे. नरेंद्र चौधरी यांच्या सार्थ निवडीबद्दल सुनिल भाऊ चौधरी (विभागीय अध्यक्ष, कल्याण), दिलीप भाऊ चौधरी (प्रसिध्दी प्रमुख), संजय बागुल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नाशिक विभाग युवा महासभा अध्यक्ष संजय चौधरी (शिरपुर), उपाध्यक्ष तुषार चौधरी, किरण चौधरी, विलास चौधरी, दत्तात्रय साळुंके, सचिन (गुड्डू) खैरनार, किशोर व्यवहारे व समाज बांधव उपस्थित होते.