नियमित व्यायाम करा, सकस आहार घ्या – नितीन तारळकर जिल्हा क्रीडाअधिकारी

38

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.5मार्च):-माढा तालुक्यातील वडशिंगे येथे अनिल ठोंबरे (सर) बहुदेशिय् शिक्षण संस्था वतीने कोरोना पार्श्वभूमीवर “मी जबाबदार” मोहीम राबविण्यात आली.राज्यभरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सोलापूर जिल्हात याबाबत मोठया प्रमाणात जनजागृती कार्य हाती घेण्यात आले आहे.मी जबाबदार या मोहिमेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल पध्दतीने कोरोना जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर व कोरोना संसर्ग जनजागृती पोस्टर वाटप करण्यात आले.

“मी मास्क वापरणार, सोशल डिस्टन्सिंग पाळणार,वेळोवेळी हात स्वच्छ धुणार” तसेच किमान २० मिनिटे तरी योगक्रिया करा असा संदेश श्री.तरलकर यांनी दिला.योगा शिक्षक श्री रणजीत पाटील यांनी योग प्रकार व क्रिया बद्दल मागर्दशन केले.500 नागरिकांनपर्यंत हा संदेश पोहचवण्यात आला आहे.या प्रसंगी अध्यक्ष अनिल ठोंबरे, समाधान लटके,सरपंच मधुकर ठोंबरे , गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.