ब्रम्हपुरी ग्रामिण रुग्णालय येथे जनतेसाठी कोविड- 19 लसीकरणास प्रारंभ

  33

  ?60 वर्षे व 45 ते 59 वर्षे वयाच्या (Comorbiditi) व्याधीग्रस्त जनतेकरीता

  ?केंद्राची वेळ – सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील

  ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

  ब्रम्हपुरी(दि.5मार्च):- कोविड-19 विषाणूच्या आपतकालीन परिस्थितीत प्रमुख प्रतिबंधात्मक कार्यवाही करीता ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे दि. 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य विभाग व इतर फन्ट लाईन कर्मचाच्याकरीता कोविड-19 लसीकरणास प्रारंभ झालेला आहे. सदर लसीचा आजपर्यंत कोणताच दुष्परिणाम जाणवलेला नाही त्या पार्श्वभुमीवर कोरोनाच्या साथीला बेळेच नियंत्रणात आणण्याकरीता लसीकरण मोहिम हि एक प्रभावी उपलब्धी आहे.

  खालील वयोगटातील व्यक्तीसाठी कोबिड-19 लसीकरण ग्रामिण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. 1) 60 वर्षे वयोगटावरील सर्व व्यक्ती तसेच ज्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत 60 वर्षे पुर्ण होत आहेत असे व्यक्ती. २) 45 वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील असे व्यक्ती ज्यांना शासनाने निर्धारीत केलेल्या 20 आजारपैकी एक किंवा अनेक आजार आहेत.

  45 वर्षे ते 59 वर्षे वयोगटाच्या व्यक्तीना व्याधी असल्याबाबतचे प्रमाणपत्र नोंदणीकृत वैद्यकिय व्यवसायिक यांचेकडून विहित नमुण्यात प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

  ऑनलाईन नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी co-WIN 2.0 या अॅपचा वापर करावा अथवा लसीकरण केंद्रावरील उपस्थित कर्मचाऱ्याकडून नोंदणी करावी. लसीकरण केंद्रावर येताना फोटो आयडी सोबत आणावे, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे.लसीकरण केंद्राची वेळ – सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. व रविवार मंगळवार व शासकिय सुट्टी वगळून इतर दिवसी नियमित लसीकरण होणार आहे.

  लसीकरण केंद्राबर दररोज 130 लाभार्थ्यांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभाध्यांनी केंद्रावर येतांना सोसियल डीस्टनचे पालन करावे. व मास्क वापरावा. तरी उपरोक्त वयोगटातील लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. व कोरोना साथीला प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे, असे आव्हान मा. डॉ. सुभाष व्ही. खिल्लारे, वैद्यकिय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय, ब्रम्हपुरी यांनी केलेले आहे.