गोसेखुर्दच्या कालव्यावर ट्रॅक्टर पलटी

77
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.5मार्च):- ब्रह्मपुरी तालुक्यातील रण मोचन गावाजवळील गोसीखुर्द कालव्याच्या कॅनल मध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 बि. आर. 6197 पलटी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली असून हिरालाल ठाकरे परसोडी वय 47 असे सदर ट्रॅक्टर ड्रायव्हरचे नाव आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाळा पिंपळगाव येथील पारधी यांच्याकडे सामान पोहोचवून वापसी जात असताना सदर घटना घडली तर नागभीड तालुक्यातील चिखल परसोडी जगदीश गायधने यांच्या मालकीची असल्याचे समजते, गंभीररीत्या जखमी झालेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात भरती करण्यात आले असून पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.