शेतकरी आंदोलनालनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी महागावचे तहसीलदाराना निवेदन

26

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.5मार्च):- वंचित बहुजन आघाडी महागाव च्या वतीने दिल्ली येथे मागील तीन(३)महिन्यांपासून चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन याविषयी न्याय्यभूमिका घेत नसल्याने,केंद्रसरकारने संसदेत केलेले शेतीविषयक कायदे हे शेतकरी विरोधातील असल्याने ते रद्द करण्यात यावे.

या शेतकरी आंदोलनातील मुख्य मागणीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण समर्थन दिले .पक्षाच्या आदेशान्वये आज दि.०५/०३/२०२१ रोज शुक्रवारला तहसीलदार साहेब,एन.जे.इसाळकर, तहसिल कार्यालय महागाव यांना सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मानकर साहेब,व श्रीराम राजनकर यांचे हस्ते निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तातेराव मानकर साहेब,श्रीरामजी राजनकर,प्रल्हादराव नवसागरे,वंदनाताई भवरे,संजय खंदारे, सतिश खाडे,विजयकुमार कांबळे, पप्पू कावळे,डॉ. देवानंद खिल्लारे,विजय लहाने,संतोष कांबळे,श्रीराम पवार,चांदू मोरे,रामराव कांबळे हे उपस्थित होते.