यंदा महाशिवरात्रीचा महोत्सव कुंडलेश्वरात साध्या पध्दतीने होणार

29

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-९९७०६३१३३२

बिलोली(दि.10मार्च):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील आराध्य दैवत कुंडलेश्वर मंदीरात दि.८ मार्च २०२१ सोमवार ते दि.१२मार्च २०२१ शुक्रवारपर्यत दरवर्षी उत्सव साजरा केला जात होता, पण यंदा “करोना” हि महामारीने सबंध जगभरात तांडव घातला असुन या महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुऴे अगदी साध्या पध्दतीने साजरा होणार आहे.या निमीत्य होणारे प्रतिवर्षा प्रमाणे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.दि.८ मार्च ते१२ मार्च दररोज आपण आपल्या घरीच ओम नमःशिवाय चा जप करावयाचा आहे.सव्वा लाख जपाचा संकल्प आहे. केलेल्या जपाची नोंद करावी.

सोबतच दररोज श्री.शिवलिलामृत पोथीचा अध्याय (३) वाचुन पारायण करावे.तर याऴात ज्यांना रुद्राभिषेक करावयाचा असेल,त्यांनी मंदिर अर्चक आनंदराव इनामदार यांच्या कडे नोंद करावी.त्या प्रमाणे नियोजन करुण त्यांचा अभिषेक करण्यात येईल. महाशिवरात्रीच्या दिवशीमंदिर भक्तांच्या दर्शनासाठी उघडे राहाणार नाही. गत वर्षी आपल्या देशात “करोनाने” मार्च २०२० ला घातलेला तांडव हा काय कमी होता काय ?तर तशीच परिस्थिती आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्या पासुन गंभीर बनत चालल्याने श्री.महादेवाचे दर्शन यंदा महाशिरात्री निमीत्याने घेता येणे शक्यच नाही. तरी सर्व भक्तांना यंदा महाशिवरात्री निमीत्य श्री शंकर पार्वती विवाहाला पण मंदिरात राहणे शक्य नाही. तर हि अशी परिस्थिती “करोना” ने निर्माण केली असल्याने आपल्याला सावध पणे या करोनाचा शिरकाव शहरात येऊ द्यायचा नसेल तर आपली भक्ति हि घरीच राहुण करावी लागणार ?

अशी परिस्थिती बनल्याने सर्व भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात येण्याचे टाऴुन आप आपल्या घरीच देवघरातील देवी देवतांची मनोभावे पुजन करुण एक साकडं, देवाला नक्कीच घालावं, “करोना” हा जगभरातुनच हदपार होण्यासाठी तीच घरी बसुन केलेली भक्ती सबंध माणव जातीच्या कल्याणासाठी उपयोगी पडेल.

“करोना”च्या निर्बधाचे तंतोतंत पालन करुण आपण व आपले शहर सुरक्षीत ठेऊ या.तर अभिषेक करणार्यानी खालील मोबाईलवर संपर्क साधावा.असे श्री.कुंडलेश्वर मंदिराचे विश्वस्त प्रा. आनंदराव इनामदार ९४०४६४५६१० अच्युतराव महाराज९३७२१२४२९० सौ. वैशालीताई इनामदार९४०३६३९६६० या भ्रमणध्वनी वर संपर्क करुण आपल्या अभिषकासाठी ची वेऴ हि निश्चित करुण “करोना” सारख्या महामारीला रोखु शकतो.

वरील कारणाने यंदा श्री.कुंडलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा सोहऴा हा साध्या पध्दतीने होणार आहे.भक्तांनी आपली वरील करोनाचे पालन योग्य पध्दतीने करण्याचीच जबाबदारीहि श्री.कुंडलेश्वरा चरणी केलेली खरी भक्ती ठरणार आहे.