बालभारतीच्या विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा प्रबोधन

35

✒️गुहागर(पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क)

गुहागर(दि.11मार्च):- “सडक सुरक्षा जीवन सुरक्षा” या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रत्यक्ष वाहनचालकांचे लोकांचे प्रबोधन केलेबालभारती पब्लिक स्कूल मध्ये आरजीपीपीएल चे एमडी ए.के सामंता यांनी कार्यशाळा घेऊन प्रथम विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन केले त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चॅटर्जी यांनी सुरक्षा विभागाच्या ज्येष्ठ व्यवस्थापक लिंडा स्कॅरिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन, लोकांना वाहनचालकांना प्रत्यक्ष थांबवुन रस्ता सुरक्षा विषयक नियमांची व अन्य महत्वपुर्ण बाबींची माहिती व प्रतिज्ञा दिली.

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या घोषवाक्ये फलकाद्वारेही त्यावेळी जनजागृती करण्यात आली. प्रशालेच्या वतीने इयत्ता सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांची “रस्ता सुरक्षा” या विषयावरती चित्रकला स्पर्धाही घेण्यातआली सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चॅटर्जी, आरजीपीपीएल चे एमडी ए.के सामंता सुरक्षा विभागाच्या ज्येष्ठ व्यवस्थापक लिंडा स्कॅरिया सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले