तलवाडा पोलीसांनी अकरा वर्षापासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

22

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)मो:-9767177932

गेवराई(दि.11मार्च):- तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे अंतर्गत रा,रुई येथील विठ्ठल बन्सी राठोड यांच्यावर 2009 मध्ये गुन्हा राजिस्टर नंबर 37,307चा गुन्हा दाखल करण्यात आला.

होता विठ्ठल बन्सी राठोड आरोपी यांची तलवाडा पोलीसांना रुई गावांत आल्याची गुपनिय माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश ऊनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक 171 प्रकाश रंगनाथ गायकवाड, पोलीस नाईक श्रीकांत बागलाने, यांनी दिं.10/4/2021 रोजी संध्याकाळी आठ वाजता रूई येथुन आरोपी विठ्ठल बन्सी राठोड यांच्या तलवाडा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे.

या दबंग कामगिरी केल्याबद्दल तलवाडा पोलीसांचे अभिनंदन होत आहे शेस्नन कोर्ट बीड येथे हजर करण्यात येणार आहे अशी माहिती तलवाडा पोलीसांनी दिली आहे